वन्यप्रेमी पर्यटकांना जंगल सफारीचा घेता येणार लाभ.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 1 जून:- चंद्रपूर वनवृत्त मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर वनपरिक्षेत्र राजुरा येथील अतिशय घनदाट निसर्गरम्य आणि समृद्ध वनसंपदेने नटलेल्या जोगापूर-राजुरा वन पर्यटन सफारी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन नुकतेच संपन्न झाले. यावेळी उपवनसंरक्षक मध्यचांदा श्वेता बोड्डू (भा. व.से.) यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी उपविभागीय वन अधिकारी राजुरा पवनकुमार जोंग, वन परिक्षेत्र अधिकारी राजुरा एस.डी.येलकेवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, तडस, चितळ, नीलगाय, रानगवे, भेडकी, रानकुत्रे, सांबर, मोर लांडोर, राणकोंबळा, विविध प्रजातीचे पशु पक्ष्याचे वास्तव्य, पिवळा पाणी तलाव, लाल पाणी तलाव, खिरणी तलाव, वाघ तलाव, दगडी तलाव, जोगापूर तलाव, इमली गुफा, टेहळणी करणारे मनोरे अशा विविध लक्षवेधी आणि मनमोहक ठिकाणं असलेल्या जोगापूर वन पर्यटनाला सुरुवात झाल्याने वन्यप्रेमी पर्यटक, नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, एक मोकळा श्वास, कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र चनाखा चे संचालक नितीन मुसळे यांचे वन विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी क्षेत्र सहाय्यक पी.आर. मत्ते, राजुरा, क्षेत्र सहाय्यक संतोष संगमवार टेंबुरवाही, क्षेत्र सहाय्यक निबुध्दे वीहीरगाव, वनपाल मत्ते, तेंदु वनरक्षक सुनील गझलवार, मारोती चापले, संदीप तोडासे, पवन मंदुलवार, पवन देशमुख, भोजराज दांडेकर, संजय सुरवसे, अर्जुन पोले, सायस हाके, अंकिता नेवारे, वर्षा वाघ, सुलभा उरकुडे , वनमजूर सीताराम सातघरे व सर्व रोजंदारी मजूर तसेच पर्यटक मार्गदर्शक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. वन्यप्रेमी पर्यटकांनी या जंगल सफारीचा लाभ मोठ्यासंख्येने घ्यावा असे आवाहन मध्य चांदा वन विभागाच्या वनपरिक्षेत्र राजुरा चे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. डी. येलकेवाड यांनी केले आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…