विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील गेदा – चंदनवेली गावातील वीजपुरवठा रात्रीबेरात्री केव्हाही, कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित केला जातो. त्यामुळे ग्रामस्थ यांची मागणी आहे की, वेळोवेळी होणाऱ्या खंडित वीजप्रवाहाबाबत ताबडतोब सुधारणा करण्यात यावी. गावातील वारंवार रात्रीबेरात्री खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकपा) एटापल्ली शाखा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकपा) एटापल्ली शाखा, गेदा आणि चंदनवेली या गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याबाबत तक्रार अभियंता महावितरण कार्यालय एटापल्ली करण्यासाठी पत्र लीहल आहे. त्यात म्हटल आहे की, या गावांमधील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, रुग्णांवर आणि दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम होत आहे.
अनेकदा नागरिकांनी तुमच्या कर्मचारी शी वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येबाबत संपर्क साधला आहे, परंतु अद्याप कोणतेही ठोस निराकरण झालेले नाही.
आम्ही आपणास मागणी करतो की:
• वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचे त्वरित निराकरण करा.
• जुन्या आणि खराब झालेल्या वीजपुरवठा लाइन दुरुस्त करा.
• वीजपुरवठा व्यवस्थेमध्ये सुधारणा करा जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवणार नाहीत.
आम्हाला खात्री आहे की आपण आमच्या तक्रारी गांभीर्याने घ्याल आणि त्वरित योग्य ती कारवाई कराल. सदर निवेदन सादर करताना भाकपा एटापल्ली कॉ. सचिन मोतकुरवार तालुका सचिव यांचा नेतृत्वात देण्यात आले यावेळी कॉ. सुरज जककुलवार, गीता भांडेकर, वनिता सिडाम, धनराज वैरागडे व इतर अनेकजण उपस्थित होते.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर…