अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- विद्या प्रसारक मंडळ सावनेर द्वारा संचालित जवाहर कन्या कला वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय,सावनेर येथे २ जुन २०२४ ला व्यवसाय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी अनिल म्हस्के उपविभागीय पोलीस उपअधीक्षक उद्घाटक म्हणून लाभले तर रामेश्वर बुरडे, (माजी मुख्य शाखा व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया व व्यवसाय मार्गदर्शक), डॉ. महेंद्र गजभिये (माध्य. शिक्षणाधिकारी जि.प.गोंदिया) श्रीराम पांडे (आयआयटी खरगपूर, नारायणा कोचिंग नागपूर), राजु पाटील माजी राष्ट्रीय सुरक्षा अकादमी अधिकारी, विद्या प्रसारक मंडळ सावनेर चे अध्यक्ष विजयराव डाहाके, सचिव नरेंद्र डाहाके, उपाध्यक्ष मदनराव डाहाके मुख्याध्यापक जवाहर विद्यालय वाकोडी, पर्यवेक्षक राजु बांबल, संस्थेचे सभासद श्रीमती विणा डाहाके, श्री.यशपाल डाहाके, डॉ. राहुल डाहाके आणि सोनाली जीवतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात ९ वी ते स्नातक पर्यंतच्या जवळपास २५० विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली. या कार्यक्रमात पालक,परिसरातील शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि मुख्याध्यापक, महासंघ सावनेरचे पदाधिकारी यांनी सुद्धा हजेरी लावली. यावेळी अनिल मस्के यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी दोन प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर पुन्हा प्रयत्न करून तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी पास झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन एमपीएससी, यूपीएससीचा खडतर प्रवास यावर सखोल मार्गदर्शन केले. तेव्हा प्रयत्नांती परमेश्वर मिळतोच असे उद्बोधन केले.
यावेळी रामेश्वर बुरडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की आपले करिअर आपल्या इच्छेनुसार निवडा आणि मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर संतुष्ट मानून पुढचं यशस्वी पाऊल टाका. डॉ.महेंद्र गजभिये यांनी मार्गदर्शनात सांगितले की जीवनामध्ये असे यश मिळवा की ज्या यशाने तुमच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येईल. तसेच परीक्षेची तयारी करताना नियोजन करणे गरजेचे आहे.
राजु पाटील यांनी एनडीए तयारी आणि अग्निविर योजना यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मदन डाहाके यांनी विद्या प्रसारक मंडळ सावनेरचे कार्य आणि संस्थेने राबविलेले वेगवेगळे सामाजिक ,सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम तसेच या कार्यक्रमाची आवश्यकता आणि महत्व यावर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.राहुल डाहाके यांनी डॉ.महेंद्रजी गजभिये यांच्या सामाजिक उपक्रमाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न मान्यवरांना विचारून त्यावर उपस्थित मान्यवरांनी समस्या निराकरण केले. या कार्यक्रमाचे संचालन उमेश महाजन व सौ प्रतिभा वडस्कर यांनी केले आणि आभार मिलिंद देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम ने करण्यात आली. व्यवसाय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळ्यासाठी जवाहर कन्या माध्यमिक व कला वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय सावनेरचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक वर्ग यांचे अमूल्य सहकार्य लाभले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…