प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे निकाल लागला आहे. त्यात भारताच्या सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाला इंडिया आघाडीने चांगलीच पटकनी दिली. त्यामुळे राम मंदिर उभाणी करण्यात आलेल्या उत्तर प्रदेशात भाजपला राम पावलाच नाही, अशी गत झाली आहे. कारण याच राज्यात अयोध्येत राम मंदिराचा मोठा सोहळा देखील झाला होता.
उत्तर प्रदेशात 80 लोकसभा मतदारसंघ असून त्यात इंडिया आघाडी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी ने जोरदार हल्लाबोल करत 43 जागी विजयश्र्वी खेचून आणली. कारण याच राज्यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरलेला होता..
या मोठ्या आणि राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या राज्यात मात्र सकाळपासूनच मात्र भारतीय जनता पक्षाला मात्र निराशाजनक चित्र पाहावे लागले आहे. उत्तर प्रदेश मधील लोकांमध्ये भाजपविषयीची नाराजीची अनेक करणे सांगण्यात येत आहेत. भाजपविषयी नाराज असणारा मतदार हा अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाकडे वळला तर तरुणांमध्ये काँग्रेसच्या बाजूने जाणारे वातावरण देखील भाजपला मारक ठरले आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमधील एकूण 80 जागांपैकी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्ष 37 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 33, काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर तर अन्य तीन जागांवर स्थानिक पक्ष आघाडीवर आहेत.
2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपा प्रणित एनडीए ला उत्तर प्रदेश मध्ये लोकसभेच्या 64 जागा जिंकल्या होत्या आणि त्यात भाजपची संख्या एकट्या 62 इतकी होती. पण 2024 च्या लोकसभा निडणुकित हा आकडा 36 वर आल्याचे दिसून येत आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…