युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- काल लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालामध्ये महाराष्ट्र राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. देशात 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला बहुमत मिळवता आलेलं नाहीये. भाजपची गाडी 240 जागांवर येऊन अडकली, तर भाजपा प्रणित एनडीएला 291 जागांसह बहुमत मिळालं आहे.
दुसरीकडे काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला 234 जागांवर आघाडी मिळाली आहे, यात एकट्या काँग्रेसला 99 जागांवर विजयी मिळाला असल्याने काँग्रेस मध्ये आनंदाचे वातावरण आहे. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात भाजपची कामगिरी खूपच वाईट झाली आहे. राज्यात भाजपला फक्त 10 जागां जिंकता आल्या आहे. तर भाजपा प्रणित महायुतीला राज्यात फक्त 17 जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने राज्यात जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर विजय मिळवला आहे. त्यात सांगलीमध्ये काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या या कामगिरीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातल्या या पराभवाची विधानसभा निवडणुकीत व्याजासह भरून काढू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पोस्ट: पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो !
इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.
उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मा. मोदीजींना साथ दिली आहे.
संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू.
महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो !
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…