अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व जिल्हा हिवताप अधिकारी वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने युपिएचडी महाविर वॉर्ड हिंगणघाट येथे हत्तीरोग दिवस वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रविणा मिसार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. जयश्री थोटे यांचे मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील लोक व रुग्ण उपस्थित होते.
यावेळी हत्तीरोग आजार बाबत डॉ.झाडे वैद्यकीय अधिकारी युपीएचडी यांनी माहिती दिली. कु.पुनम भुसारी आरोग्य पर्यवेक्षक यांनी रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा बाबत माहिती दिली, मिलिंद डोनारकर आरोग्य सहाय्यक यांनी युआयडी व त्यापासुन रुग्णांना मिळणारे लाभ याबाबत माहिती दिली. उमेश मेश्राम यांनी रुग्णांना काळजी, उपाययोजना याबाबत प्रात्यक्षीक करून दाखविले व रुग्णांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी राम मेश्राम, डखाराम मेश्राम, असलम फारुकी, सुभाष वाडगे, व युपीएचडी महावीर वॉर्ड येथील कर्मचारी तसेच प्रिती ठोंबरे, हर्षाकला पुरी, वैशाली भडे, सोनट्टके उपस्थित होते.
अहेरी: अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा जनाधार झपाट्याने मजबूत होत आहे. नुकत्याच नारायणपूर येथे आयोजित…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809 अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…