अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- काल लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष्याचा उमेदवाराने दारुण पराभव केला. त्यामुळे परत भाजपची अंतर्गत बाबी समोर आल्या आहे.
वर्धा लोकसभा निवडणूकीत भाजपा उमेदवारला ज्या विधानसभा क्षेत्रातून लीड मिळेल त्याच भाजप आमदारला पुन्हा टिकिट दीले जाईल, अशी तंबी भाजपच्या वरिष्ट नेत्यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान दिली होती. परंतु अप्रत्याशित निकाल लागल्याने आता या तंबी ला काहीच अर्थ उरला नाही. आता तर जो सोबत आहे त्यालाच घेऊन पुढे चालावं लागेल अशी भाजप मधे चर्चा सूरू आहे.
विधानसभा क्षेत्र निहाय जवाबदारी भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने आमदारांना देऊन कामाला लावले होते. वर्धातुन डॉ. पंकज भोयर, आर्वीतुन दादाराव केचे, हिंगणघाट येतून समीर कुणावर तर धामणगाव मधून प्रताप अडसड याना रामदास तडस ला विजयी करण्याची जबाबदारी दिल्या गेली होती. मोर्शीत अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार तर देवळी मध्ये विपक्ष आमदार असल्याने तिथे संघटना प्रमुख राजेश बकाने याच्या खांद्यावर जवाबदारी सोपविण्यात आली. यात फक्त भोयर व देवेंद्र भुयार हेच काही प्रमाणात यशस्वी झाले.
वर्धा मतदारसंघामध्ये तडस 7 हजार मताने मागे आहे. देवळी येथून 40 हजार, हिंगणघाट येथून 15 हजार, धामणगाव येथून 17 हजार आणि आर्वी येथून 14 हजार मताने भाजपा उमेदवार रामदास तडस मागे आहे. त्यामुळे त्यांचा दारुण पराभव झाला आहे. रामदास तडस यांना फक्त मोर्शी विधानसभा क्षेत्रातुन 12 हजार मताची लीड मिळाली आहे.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांना देवळी, आर्वी, हिंगणघाट, धामणगाव ने चांगली लीड दीली. एकट्या देवळी विधानसभा मतदारसंघने काळे याना विजयी करण्यास भक्कम साथ दिली. तसे पाहता देवळी क्षेत्र तडस चां गढ समझल्या जात होता. इथे पालिका मध्ये त्याच नेहमी वर्चस्व राहत आल आहे. त्यासोबत इथल्या अन्य संस्था वर ही त्यांच वर्चस्व आहे. इथले विविध विकास कार्य करून त्यांनी देवळीला शहराच रुप दिलं आहे. परंतु त्यांच्या पारिवारिक कलहामुळे त्यांना इथे हि मागे राहावे लागले.
याचा विपरीत देवळीचे काँग्रेसचे दिग्गज आमदार रणजित कांबळे ने अमर काळे याची उमीदवारी प्रतिष्ठेची समजून काम केले, आणि याचे सारे श्रेय त्यांना दिले जात आहे. विशेष हे की राष्ट्रवादी ही जागा काँगेस ला सोडण्यास तयार नव्हती. परंतु सक्षम उमेदवार अभावी त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता. शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांना आमदार कांबळे ने अमर काळेचां पर्याय सर्वप्रथम सुचविल्याचे समजते. अमर काळे बाबत विचार का करीत नाही असा प्रश्न त्यांनी संयुक्त बैठक मध्ये केला होता. कांग्रेसचे काळे याना राष्ट्रवादीच्या तुतारी वर लढविण्याचा डाव कांबळे ने खेळला आणि ते यात यशस्वी झाले.
अमर काळे यांनी पण राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यास लगेच हामी भरली. देवळी विधानसभा क्षेत्रातून काळे च्या उमेदवारीचा उगम आणि त्यांच्या विजयाची पाया रचला गेला. हिंगणघाट येथे तडसचे प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांच्या सभे करीता लोकांना जमा करण्याची कसरत होती. या करिता आमदार कुणावार यांचे कार्यकर्ते सभेसाठी गर्दी जमा करण्यासाठी धडपडत होते. परंतु त्यांचे प्रयत्न सफल होत नव्हते. शेवटी त्यानी कुणावार कडे पाहून लोकांना सभेसाठी तयार केले. तरीही हिंगणघाट मध्ये रामदास तडस पीछाड़ीवर राहीले.
आर्वी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला अमर काळे व रामदास तडस यांच्या मध्ये नेक टू नेक वोटिंग होत होती. विशेष म्हणजे इथे मोदीची सभा घेण्यात आली होती. परंतु गावचा माणूस खासदार होत आहे, यामुळे आर्वीच्या लोकांनी अमर काळे यांना साथ दिली. आर्वी, हिंगणघाट, देवळी आणि धामणगाव इथून भरभरून मते मिळाल्याने अमर काळे यांनी यशाची पताका फडकवली.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…