उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- देशात गोरगरिबांसाठी, दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकार मोफत धान्य वाटप योजना राबवत आहे. राशन कार्डच्या मदतीने कोट्यवधी गरीब कुटुंबांना स्वस्त दरात राशन मिळत आहे. परंतु, अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदारच लाभार्थ्यांच्या रेशनवर डल्ला मारतो. काही लाभार्थ्यांची तर धान्यच संपल्याची थाप मारुन बोळवण केल्या जाते. अकोला जिल्हातील पडसो बढे येथील राशन दुकानदाराची दादागिरी समोर आली आहे. गावातील नागरिकांना राशन देण्यास राशन दुकानदाराचा नकार दिला असल्याने सरकारच्या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रामकृष्ण रामचंद्र लाळे रा. पडसो बढे रहीवाशी असुन त्यांच्या पत्नी सौ. छाया रामकृष्ण लाळे यांच्या नावाने लाळे कुटुंबाचे राशन कार्ड आहे, रामकृष्ण लाळे यांच्या कडे केसरी रंगाचे राशन कार्ड असुन त्याचा क्र. अनुक्रमांक ST. No. 1787155 असा आहे. पंरतु पडसो बढे येथील राशन दुकानदार दिनेश सुधाम ठाकरे यांचे दुकानामधून त्यांना स्वस्त धान्य मिळत असते. दिनेश सुदाम ठाकरे हे अकोला येथे राहतात. पडसो बढे येथे राशन दुकानदार दिनेश ठाकरे राहतच नाहीत. त्यांचे फक्त घर व शेती पडसो बढे येथे आहे. स्वस्त धान्याच्या दुकानात प्रदिप चंदु गांवडे हे काम करतात.
पण प्रदिप गावंडे अर्धा पाउन तास दुकान उघडतात व बंद करतात. पडसो बढे येथील बहुतांश लोकांना राशन मिळत नाही. गावातील नागरिक येथील दुकानावर राशन आणण्याकरिता गेले असता, राशन संपले तुम्ही उशिरा आले असे सांगुन नागरिकांना परत पाठविले जाते. राशन दुकान मालक दिनेश सुदाम ठाकरे हे असुन राशन दुकानाचा सर्व कारभार दुकानात काम करणारा व्यक्ति प्रदिप गावंडे पाहतो. राशन घ्यायला गेलेल्या नागरिकांना उध्दटपणे बोलतो.
रामकृष्ण लाळे हे त्यांच्या पत्नीचे नावाने असलेले कार्ड घेउन ते दिनांक २९ मे रोजी सायंकाळी ५.०० वा सुमारास स्वस्त धान्य आणण्यासाठी गेले असता प्रदिप चंदु गावंडे हे स्वस्त धान्य दुकानात हजर होते. रामकृष्ण लाळे यांनी त्यांना प्रदिप चंदु गावंडे यांना मागील कोठ्याचे व तसेच चालू कोट्याचे राशन मागीतले असता लाळे यांना गावंडे यांनी राशन देण्यास नकार दिला व तुम्हच्याने जे होईल ते करुन घ्या, असे म्हणाले. व त्यापूर्वि राशन दुकानदार दिनेश ठाकरे ला फोन केला असता, मालकाने तुम्हाला राशन मिळुन जाईल असे सांगितले. मात्र पुन्हा फोन लावला असता प्रदिप गावंडे यांचेच बाजुने राशन दुकानदार दिनेश ठाकरे बोलत होता व तुम्हाला राशन मिळणार नाही असे इतरांना राशन मिळणार नाही असे सांगुन फोन कट केला.
पडसो बढे येथील नागरिकांना राशन मिळण्याची व्यवस्था करावी. राशन दुकानाला स्वस्त धान्याचे दुकान अशी पाटी सुध्दा नाही. बहुतांश वेळा ही दुकान बंदच राहते म्हणून दुकानाची दररोजची उघडण्याची व बंद करण्याची वेळ निश्चीत करावी, व ग्राहकांना राशन का देव्यात येत नाही. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी. सदर व राशन दुकानदार व तेथील कर्मचारी यांची दादागिरी थांबवावी अशी मागणी पडसो बढे येथील नागरिक रामकृष्ण लाळे, रमेश वाहुरवाघ, रामकृष्ण ढवळे, पंकज ठोके, आशिष ठोके, मंगेश गवई , हिरालाल ढवळे, प्रविण लाळे, संजय गवई, विनायक लाळे, यांनी तहसीलदार अकोला व जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला, यांच्या कडे केलेल्या तक्रारी द्वारा केली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…