संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सध्या राजुरा तालुक्यात गाजत असलेले प्रकरण म्हणजे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. देवाडा येथे लाखो रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरण समोर आल्याने जिल्हात खळबळ उडाली आहे. भष्ट्राचारी शाखा व्यवस्थापकाने मृतक शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलून लाखो रुपये हडप केला त्यामुळे बँकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
राजुरा तालुक्यातील सोंडो येथील शेतकरी विठ्ठल महादू मेश्राम वय ७५ वर्ष यांची वडलोपार्जित शेतजमीन आहे. सोंडो येथील सर्व्ह नंबर ४२ मधील २४ एकर व सौ सर्व्ह नंबर ५३ मध्ये १० एकर शेतजमीन आहे. यांच्या शेतजमिनीवर याच गावचे सरपंच जयपाल आत्राम व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. देवाडा या चे शाखा व्यवस्थापक जगन कुंडलिक दुर्गे यांनी संस्थेतून बनावट कागदपत्रे व शेतकऱ्याची सहमती न घेता परस्पर कर्ज घेतले.
मधुकर बाबुराव मेश्राम यांच्या नावाने ६८,४९७ व प्रभाकर बाबुराव मेश्राम यांच्या नावाने ४०,०९० रुपयांचे कर्ज आहे. दोघांचाही मृत्यू झालेला असून सातबाऱ्यावर नाव असलेले विठ्ठल महादू मेश्राम मृतकांच्या नावाचे सोसायटीने नोटीसद्वारे कर्जाची भरणा करण्यासाठी कळविण्यात आले. त्यामुळे हा कर्जाचा बनावट प्रकार शेतकरी विठ्ठल मेश्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाच्या आदेशानुसार २८ एप्रिल २०२४ ला राजुरा पोलीस स्टेशन ला जयपाल मारोती आत्राम, सरपंच रा. सोंडो व जगन कुंडलिक दुर्गे, शाखा व्यवस्थापक, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. देवाडा यांनी संगनमत करून बनावट खोटे दस्तऐवज, स्वाक्षरी व अफरातफर करून फसवणूक केल्यावरून प्रथम श्रेणी वर्ग १ कोर्ट राजुरा यांचे आदेशानुसार भादवी कलम ४०६, ४२०, ४६५, १२०-ब,४६८ अन्वये गुन्हा नोंद केला असून सध्या दोन्ही आरोपी फरार आहे. या दोन्ही आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी व या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेत शेतकरी विठ्ठल मेश्राम यांनी केली आहे. या घटनेचा तपास राजुरा पोलीस करीत आहे.
शाखा व्यवस्थापक फरार..
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. देवाडा शाखा व्यवस्थापक जगन कुंडलिक दुर्गे यांनी मृतक शेतकऱ्याचा नावावर कर्ज उचलून लाखो रुपये लुटले आणि ते फरार आहे. अजून भष्ट्राचाराचे तालुक्यात असे अनेक प्रकार समोर येऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. फरार आरोपी जगन कुंडलिक दुर्गे हे अजून पर्यंत पोलिसाना मिळून न आल्याने तालुक्यात विविध चर्चेला उधाण आले आहे.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…
आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…