गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात इंडिया आघाडी उमेदवार डॉ. नामदेव किरसान विजयी तर महायुतीचे उमेदवार अशोक नेते चा पराभव.
विश्वनाथ जांभूळकर, एट्टापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एट्टापल्ली:- गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील निवडणुकीत डॉ. नामदेव किरसान यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाकपा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) व आयटक (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस) यांच्या ठोस पाठिंब्यामुळे हाच विजय शक्य झाला आहे. या विजयाने गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील जनतेने परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
भाकपा आणि आयटकच्या कार्यकर्त्यांनी डॉ. किरसान यांच्या प्रचारात अपार मेहनत घेतली. त्यांनी स्थानिक स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले,उदा. भाजपा हटावो देश बचाओ अभियान, आयटकचे अनेक सभा व इतर प्रयत्न. जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांच्या अडचणींना वाचा फोडली. या समर्पित कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच डॉ. किरसान यांना मोठा विजय मिळवता आला.
गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील जनतेने यावेळी एक नवा इतिहास रचला आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे डॉ. नामदेव किरसान यांनी महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत डॉ. किरसान यांनी मिळवलेल्या विजयामुळे क्षेत्रातील विकास, शैक्षणिक सुधारणा, आणि जल, जंगल, जमीन चा मुद्याना चालना मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
भाकपा व आयटकच्या नेत्यांनी सांगितले की, “डॉ. किरसान यांचा विजय हा केवळ एक निवडणुकी तील विजय नसून, हा विजय आहे. जनतेच्या अधिकारांचा, त्यांच्या आशा-आकांक्षांचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या संकल्पांचा. आम्ही या विजयाचा अभिमान बाळगतो आणि पुढेही जनतेच्या सेवेत राहू.”
कॉ. सचिन मोतकुरवार अहेरी विधानसभा अध्यक्ष भाकपा व आयटक यांनी या विजयाबद्दल आभार मानले म्हटले की, “ही विजय जनता, कार्यकर्ते आणि सर्व समर्थकांची आहे. मला संपूर्ण विश्वास आहे की, एकत्र येऊन आपण गडचिरोली-चिमूर क्षेत्राला विकासाच्या नवीन शिखरांवर घेऊन जाऊ.”
या विजयाने गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील राजकीय वातावरणात मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. यापुढे या क्षेत्राचा विकास, कल्याणकारी योजना आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचे पालन हे प्रमुख ध्येय राहणार आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…