संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा, दि. ०९:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची आज शपथ घेतली. त्यांच्यासमवेत देशभरातून विविध मंत्र्यांनीही पद व गोपनियतेची शपथ घेत भारताच्या सेवेच्या नव्या अध्यायास सुरुवात केली; या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भारतीय जनता पार्टी राजुरा तालुका व शहरच्या वतीने विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र तथा जनसंपर्क कार्यालयात राजधानी दिल्ली येथील शपथविधी सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचे सामुहिक दृकश्रवण करीत एकमेकांना मिष्टान्न भरवत फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. त्यानंतर, भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पंचायत समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. याठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून मोदी सरकारच्या शपथविधीचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, शहराध्यक्ष सुरेश रागीट, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, जिल्हा सचिव संजय उपगण्लावार, भाऊराव चंदनखेडे, वामन तुराणकर, दिलीप गिरसावळे, विनोद नरेंदुलवार, लक्ष्मन निरांजने, राजेश वाटेकर, संतोष कोकोडे, मंगेश श्रीराम, प्रफुल्ल घोटेकर, किशोर रागीट, गणपत उरकुडे, अंकुश कायरकर, मिथुन थिपे, महेश झाडे, जगदीश साठोणे, विलास खिरटकर, अमोल पानघाटे, मंगल चव्हाण, प्रणव मसादे, मयुर झाडे, स्वरूपा झंवर, लक्ष्मी बिस्वास, अल्का जुलमे, रजनी बोढेकर, योगीता भोयर, पूजा गुंटी, दीपा बोंथला आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…