अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट नगर परिषदच्या वतीने मान्सून पूर्व नाले सफाईच्या कामाची सुरुवात झाली आहे. नाल्यातील गाळ आणि कचरा यामुळे नाल्याचे पाणी अडनार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
भारतीय हवामान विभागने यावर्षी सामान्य पेक्षा जास्त पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. सोबतच हवामानच्या बदली ने अकाली पाऊस होण्याचा पण इशारा दिला आहे. त्यामुळे हिंगणघाट नगर परिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पावसाळी पूर्व नाले सफाईचे काम मागील 01 महिन्या पासून सुरू आहे.
या मोहिमेत स्वच्छता विभाग कर्मचारी, जेसीबी व ट्रॅक्टर द्वारे मान्सून पूर्व नाले सफाईची मुहिम करीत आहे. नाले सफाई अभियान अंतर्गत मोठे आणि छोटे नाल्याची संपूर्ण स्वच्छता केल्या जात आहे. पावसाचे पानी सहजतेने निघण्यास यामुळे फायदा होणार आहे. या नाले सफाई अभियानमुळे नाल्यातुन पाणी निघण्याची क्षमता वाढून किनाऱ्या वरील वस्तीला या मुळे पावसाळ्यात पुराचा धोका होणार नाही.
शहरातील लहान मोठ्या नाल्याची साफसफाईच्या कामास गति देऊन मनुष्य बल आणि जेसीबी द्वारे नाल्याचा गाळ आणि कचरा बाहेर काढला जात आहे. सोबतच नाल्याच्या आसपास वाढलेल्या झाडा झुडपाना देखील काढल्या जात आहे. नगरपरिषद द्वारे आता पर्यंत एकूण 17 मोठे नाले व 28 छोटे नालेची सफाई केली आहे.
नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक हर्षल गायकवाड याच्या मार्गदर्शनात स्वच्छता विभाग प्रमुख विशाल ब्राह्मणकर, स्वास्थ निरीक्षक विजय खोब्रागडे, अविनाश चव्हाण सह सर्व मुकादम आणि स्वच्छता कर्मचारी नाले सफाईच्या कामात लागले आहे. हे नाले सफाईचे काम 10 दिवसात पूर्ण होणार आहे. शहरतील ज्या प्रभागातील नाले सफाई झाली नसल्यास नगर परिषदच्या आरोग्य विभागला संपर्क करण्याचे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी यांनी केले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…