पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज | ऑनलाइन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील बाणेर परिसरातील धनकुडे वस्ती येथे एका युवकाचा डोक्यात दगड घालून हत्या झाल्याच्या घटनेने धनगुडे वस्ती हादरली आहे. ही घटना रविवारी (दि.9) सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून बेड्या ठोकल्या आहे. अनैतिक संबंधातून आरोपीने या युवकाची हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. नाना विठ्ठल चादर वय 36 वर्ष रा. वाकड गावठाण वाकड असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. कृष्णा भीमराव सुरोसे वय 40 वर्ष रा. बालेवाडी गावठाण मुळ रा. आनंदवाडी, ता. परतूर, जि. परभणी असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत हत्या करण्यात आलेल्या नाना चादर याचा भाऊ सचिन विठ्ठल चादर वय 34 वर्ष रा. वाकड गावठाण, वाकड यांनी रविवारी (दि.9) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
आरोपी कृष्णा आणि मृतक नाना हे दोघे मित्र होते. कृष्णा अंबरनाथ परिसरात कुटुंबासोबत राहत होता. 2016 मध्ये तो बालेवाडी परिसरात राहण्यास आला. बालेवाडीत आल्यानंतर त्याची ओळख नाना चादर याच्यासोबत झाली. आरोपीच्या नात्यातील एका महिलेसोबत नाना चादर याचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे आरोपी नाना याच्यावर चिडून होता.
कृष्णा आणि मयत नाना चादर यांना दारु पिण्याचे व्यसन होते. 7 जून रोजी रात्री चादर आणि त्याचा मित्र रामदास धनगुडे यांनी मोकळ्या जागेत दारु प्याली. दारुच्या नशेत नाना त्याच ठिकाणी झोपी गेला. धनगुडे तेथून निघून गेला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी कृष्णा याला गांजा ओढण्याची तलफ झाली. त्यामुळे तो गांजा ओढण्यासाठी मोकळ्या जागेत आला. त्यावेळी त्याने नाना चादर दारुच्या नशेत झोपल्याचे पाहिले. चादर याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करुन कृष्णा पसार झाला.
गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तांत्रिक तपास करुन आरोपी कृष्णा सुरोशे याला अंबरनात परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नाना चादर याचे नात्यातील महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने त्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे आरोपीने सांगितले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चार चे पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार वैभव मगदूम, हरीश मोरे, सारस साळवी, प्रवीण भालचिम, अजय गायकवाड, संजय आढारी, वैभव रणपिसे, नागेशसिंह कुंवर, एकनाथ जोशी यांच्या पथकाने केली
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…