आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना आता GST देश वासियांना रडवणार.

महाराष्ट्र संदेश न्युज रिपोर्टर
दिल्ली :-
देशातील सर्वसामान्य नागरिकची आधीच महागाईची झळ शोषून कंबरडे मोडले असताना आता अजुन त्यांच्या खिशावर महागाईचा भार पडणार आहे. दी. 18 जुलैपासून नवीन जीएसटी दर संपूर्ण देशात लागू होणार आहेत. सरकारने अनेक नव्या वस्तूंवर जीएसटी लागू केली आहे. नव्या जीएसटी दरानुसार, खाणं- पिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार आहेत. त्यामुळे महागाई आणखी रडवणार आहे. अन्नधान्यांवरही जीएसटी लागू होणार आहे. धान्य आणि डाळीच्या किंमतीत 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले. महागाईचा हा सर्व भार ग्राहकांवरच पडणार आहे.

काय गोष्टी महागणार

पाकिट मध्ये बंद आणि लेबल असलेल्या (फ्रोजन वगळता) खाद्यपदार्थांवर जीएसटी कर लागू करण्यात आला आहे. यामध्ये मासे, टेट्रा पॅकमधील दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत हे पदार्थ जीएसटीबाहेर होते. त्याशिवाय, बँकेकडून जारी करण्यात येणाऱ्या धनादेश सेवांवर 18 टक्के आणि एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. एक हजार रुपयांपेक्षा प्रति दिवस भाडे असणाऱ्या हॉटेल रुम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. एलईडी लाइट्स आणि लॅम्पच्या किंमतीदेखील वाढवण्याची शक्यता आहे. सरकारने या वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर केली आहे.

सायकल पंप, टर्बाइन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता 18 टक्के टॅक्स आकारला जाणार आहे. तसेच बियाणे साफ करण्यासाठी आणि वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मशीनवर 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे. सोलर वॉटर हिटर्सवरही 12 टक्के GST आकारण्यात येणार आहे. याआधी पाच टक्के जीएसटी आकारण्यात येत होता.

आरोग्यसेवा महागणार

अगोदरच सर्वसामन्याच्या हाता बाहेर असलेली रुग्णालयाची सेवा अजुन महाग होणार आहे. रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्याशिवाय, जैव-वैद्यकीय कचऱ्यावर (Biomedical Waste ) प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या सुविधेवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या जीएसटी विरोधात केंद्र सरकारला पत्र लिहीले आहे. हा जीएसटी तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

शैक्षणिक वस्तू महागणार

अगोदरच शासनाने सरकारी शाळा बंद केल्या त्यामुळे अनेक गरीब मुलाचे भविष्य अंधारमय झाले आहे त्यात आता मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे,. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आर्वित विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी फडणवीस यांचे विश्वासू वानखेडे यांचा केला गेम? भाजपात विविध चर्चेला उधाण.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…

6 hours ago

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

24 hours ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

1 day ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

1 day ago