राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. घेतलेल्या नवीन घराच्या रजिस्ट्रेशनच्या कामासाठी दुचाकी मोटार सायकलवरून जात असलेल्या पोलीस हवालदाराचा आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका महिलेचा डंपरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि.१२) सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास ठाण्यात घडली. सुनिल रावते वय 45 वर्ष, रा. सावरकरनगर, ठाणे आणि मिमा रामपूरकर वय 40 वर्ष रा. विटावा, ठाणे असे दोन्ही मृतकाची नावे आहेत. मयत सुनील रावते हे ठाणे क्राईम ब्रांचच्या वागळे युनिटमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अपघाती निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक सुनिल रावते हे वागळे स्टेट परिसरातील सावरकरनगर भागात वास्तव्याला आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी वसंतविहार परिसरात नवीन घर खरेदी केले होते. याच घराच्या रजिस्ट्रेशनसाठी ते बुधवारी सकाळी घरातून बाहेर पडले होते. निबंधक कार्यालयात घराची नोंदणी करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या मिमा रामपूरकर या महिलेसह ते त्यांच्या मोटारसायकलीवरुन जात वर्तकनगरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी 11.30 च्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलला कोरस टॉवरजवळ भरघाव वेगाने आलेल्या एका डंपरने जोरदार धडक दिली.
या धडकेत सुनिल रावते आणि त्यांच्या सोबत असलेली महिला दोघेही गंभीररित्या जखमी झाले. दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघाताला कारणीभूत असलेल्या डंपर चालकाविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतक रावते यांच्या मागे पत्नी, 17 वर्षांचा मुलगा आणि 10 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ठाणे शहर पोलिस दलात क्राईम ब्रांचच्या वागळे युनिटमध्ये ते कार्यरत होते. यापूर्वी ते पोलिस 10 मुख्यालय, नौपाडा विभागाचे सहायक आयुक्त कार्यालयात नेमणूकीला होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…