पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अगदी क्षुल्लक वादातून दोन अल्पवयीन मुलांनी मिळून दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करीत त्याची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली. पीयुष चक्रधर अतकरी वय 17 वर्ष, रा. पारडी असे मृताचे नाव आहे. तो गुमथळा येथे मामाकडे शिकत असून उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आई-वडिलांकडे आला होता.
पीयुष त्याच्या दोन मित्रांसह पारडी परिसरात असलेल्या शिकवणी वर्गाला मागच्या रस्त्याने जात असताना, गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्याला एका मुलगा सातत्याने शिवीगाळ करीत होता. घटनेच्या दिवशी शनिवारीही (ता.८) त्याने शिवीगाळ केल्याने पीयुषने त्याला रविवारी पारडीतील लाल शाळेच्या मागच्या मैदानात भेटण्यासाठी बोलाविले. रविवारी (ता.९) पियुष आणि त्याचे दोन मित्र रात्री 8.30 वाजताच्या सुमारास पारडीतील बस स्टॅण्ड जवळील ब्रदर्स नावाच्या सलून मध्ये बसले होते. पीयुषला शिवीगाळ करणाऱ्या युवकाचा इन्स्टाग्रामवरून कॉल आला.
बोलायचे असल्याने शिकवणी वर्गाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेवर भेटण्यास बोलाविले. पीयुष व त्याचे चार मित्र तिथे गेले. तिथे आरोपी मुलासह त्याचा मित्रासोबत उभा होता. पीयुषने त्याला भांडण करायचे नसून बोलून वाद संपविण्याची मागणी केली. मात्र, आरोपीने शिवीगाळ करून त्याला हातबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे पीयुषने त्याला पटकणी देत, खाली पाडले आणि मारू लागला. इतक्यातच त्याच्यामित्राने खिशातून चाकू काढून पीयुषच्या पोटावर, छातीवर आणि हातावर वार करून दोघांनीही पळ काढला. मित्रांनी पियुषला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी (ता.११) सकाळी उपचारादरम्यान पीयुषचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी 302 अंतर्गत गुन्हा दाखल करीत, दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…