अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत गरोदर महिला आणि ०६ महिने ते ०३ वर्षे वयोगटातील लहान मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ‘मल्टी मिक्स सिरीयल्स अड प्रोटीन्स प्रिमीक्स’ कंपनी तर्फे मिळण्यात येणारे पोषण आहार चे साहित्य निकृष्ट दर्जाचे असुन गर्भवती माता आणि लहान मुलांच्या आरोग्याला बाधा होत आहे.
यापूर्वी मिळणारे पोषण आहार मुगाची दाळ, गहु, तांदुळ, चनादाळ, चना, तेल, साखर, हळद, मिठ, तिखट, मसुरची दाळ ईत्यादि चांगल्या प्रकारचे साहित्य सरकार तर्फे मिळत होती. पण ‘मल्टी मिक्स सिरीयल्स अड प्रोटीन्स प्रिमीक्स’ कंपनी तर्फे मिळण्यात येणारे पोषण आहार चे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. ही समस्या घेऊन महिलांनी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली व समस्या सांगितल्या. यावर माजी आमदार तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष घालून मल्टी मिक्स सिरीयल अँड प्रोटीन मिक्स कंपनी वर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक सौरभ तिमांडे, शकील अहमद उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग (एकात्मिक बाल विकास सेवा योजना) अंतर्गत गरोदर महिला आणि ०६ महीने ते ०३ वर्षे वयोगटातील मुलांचे आरोग्य चांगले व फाययदेशिर राहण्यासाठी ‘मल्टी मिक्स सिरीयल्स ॲड प्रोटीन्स प्रिमीक्स’ कंपनी तर्फे निकृष्ट दर्जाचे असुन माता व लहान मुलांच्या आरोग्याला बाधा निर्माण होत आहे.
हा माल खराब असल्यामुळे गरोदर महिलांना कडधान्याचा कडसड वास येवुन पोटदुखीचा त्रास होत आहे. तसेच लहान मुलांना या खराब कडधान्यामुळे उलटयांचा, पोटदुखी, पातळ संडास अशा प्रकारचा त्रास होत असुन महाराष्ट्र मध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. ही गंभीर समस्या एकट्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात होत नसून संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. याप्रकारे गरोदर महिला व लहान मुलांच्या आरोग्याशी “मल्टीमिक्स प्रोटीन कंपनी” खेळ करत आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवणाऱ्या कंपनीवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर सरकार अशा कंपन्यांवर कारवाई करत नसेल तर सरकारची आणि या कंपनीची साठगाठ असण्याची शंका उपस्थित केली.
या वेळी नाजी शेख, कविता वानखेडे, काजल जीवने, निशा तामगाडगे, भाग्यश्री हेमंत पढरे, निशा तामगाडगे, काजल आदीत्य जिवने, शिवानी कनोजिया, संध्या मडावी, सागर धुल, संदिप भुईकर, वर्षा रणदिवे, वर्षा योगेश रणदिवे, मोनिका भगत, तनवीर शेख, निमा शंकर अंबाडरे, नलुताई शेळके, निकीता भोराक, सपना मैंद, नंदनी तुमडाम, अश्विनी नाकतोडे, खुशबु शेख, प्राची वाघे, प्रेमीला खंडाळकर शंकर अंबाडरे, योगेश रंगदीवे, निखील सुरसे, स्वप्नील वाघ, सपना मेहत, कुष्णात नाकतोडे, राहुल शेळके इत्यादि महिलांनी व पुरुष उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…