नागपूर जिल्ह्यातील धामणा (लिंगा) येथील चामुंडी एक्सप्लोसिव कंपनीत भिषण स्फोट 7 कामगारांचा भाजून कोळसा, 6 महिलाचा समावेश.

काल (दि.13) गुरुवार ला धामणा येथिल सात महिला व काही पुरुष नेहमी प्रमाणे गावाजवळील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कम्पनीत कामावर गेल्या परंतु काळ त्यांची वाट पहात बसला होता, दुपारी 1.00 वाजताच्या सुमारास डिटोनेटरची (फटाका) वातीची कटींग सुरु असतांनाच अचानक स्फोट झाला. यात तिन चेंबर मध्ये काम करीत असलेले कामगार होरपळून गेले काहींना बाहेर फेकले यात चार कामगार तरुणी सह एका पुरुष कामगाराचा जागीच मृत्यु झाला तर एक महिला दवाखान्यात उपचार करतांना मरण पावली. तर तीन कामगार गंभीर जखमी झाले .मृतांमध्ये कु.वैशाली आनंदराव क्षीरसागर वय 21 वर्ष, कु.प्रांजली किसना मोदरे वय 22 वर्ष, कु.प्राची श्रीकांत फलके वय 19 वर्ष, कु.मोनाली शंकरराव अलोने वय 25 वर्ष, सो.शितल आशिष चटप वय 29 वर्ष सर्व रा .धामणा व पन्नालाल रेखालाल बंदेवार वय 60 वर्ष रा.सातनवरी अशी मृतकांची नावे असुन श्रद्धा वनराज पाटील वय 22 वर्ष रा.धामणा, प्रमोद मुरलीधर चव्हारे वय 25 वर्ष रा.नेरी (मानकर) व दानसा मरसकोल्हे वय 26 वर्ष रा. मध्यप्रदेश अशी गंभीर जखमींची नावे असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दारू गोळा कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटनेची माहिती मिळताच सर्व प्रशासन घटनास्थळी पोहचले यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख घटणास्थळी पोहचले तर नागपूर पोलीस कमिशनर रविंद्र सिंघल पोलीस ताफ्या सह घटना स्थळावर डेरेदाखल झाले आहे.

नागपूर जिल्ह्यातील चामुंडी एक्सप्लोसिव कंपनीमधे स्फोटा पूर्वी सहा महिन्यां आधी याच महामार्गावरील चाकडोह येथील बारूद कंपनीतही स्फोट झाला होता.
यात ही नऊ कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तेंव्हा सोलार एक्स्प्लॉजिव इंडस्ट्रीज कडून प्रत्येकी २५लाखाचे धनादेश देण्यात आले होते.तर सरकार कडून ही मृतकाचे कुटूंबियांना पाच लाखांची घोषणा केली होती. धामणा येथील चामुंडी दारूगोळा कंपनीचे स्फोटात मृतकांचा आकडा सहा असल्याचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी सांगितले आहे.

घटनास्थळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रामकुमार बर्वे यांनी भेट दिली.
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुनिताताई गावंडे, माजी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती भारतीताई पाटील, नागपूर पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पारधी, काँग्रेसचे नागपूर (वाडी) येथील जिल्ह्याचे नेते शैलेश थोराणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आकाश गजबे, यांनी भेटी दिल्या व म्रुतक व जखमीं कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा म्हणून महामार्ग रोखून धरला, काही काळ स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ता मंडळींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला तर पोलिस विभागाने कडक बंदोबस्त करत सिमा बंदी करत कोणत्याही प्रकारची घटना वा उपद्रव होऊ नये यासाठी प्रयत्न केले, पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळ व कंपनी परिसर पोलिस छावणीत रुपांतरित केली.नागपूर शहर व ग्रामीण भागातील तीनही पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी नजर ठेवून होते.कोंढाळी येथील तिवारी पोलिस अधिकारी, कळमेश्वर येथील जमादार प्रदीप गायकवाड सह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, हिंगणा ठाणा पेठ (काळडोंगरी) चे बीट अधिकारी अरविंद नाईक सह अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त केला. पोलिस बलाने आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले होते स्थानिक नागरिकांनी व नेते मंडळींनी भरपाईची मागणी लेखी रूपात पोलिस विभागाला सोपवली.

मनवेल शेळके

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

5 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

5 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

6 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

7 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

7 hours ago