हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन बल्लारपूर:- दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ला वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरच्या वतीने शहरातील विविध समस्येला घेऊन “निवेदन पदयात्रा” आयोजित करण्यात आली होती या पदयात्रेच्या माध्यमातून चार वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांना चार निवेदनं देण्यात आली. त्यामाध्यमातून शहरातील नागरिकांच्या विविध मागण्या शासन आणि प्रशासन यांच्या पुढे माडण्यात आल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीच्या या मागणीला यश आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणार सौदर्यारिकरण व मजबुतीकरण लवकरच होणार आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी बल्लारपूर ही ‘निवेदन पदयात्रा’ जिल्हा संघटक अजयजी गावंडे यांच्या नेतृत्वात व सत्यभामा भाले महिला आघाडी जिल्हा सल्लागार, नम्रता साव तालुकाध्यक्षा महिला आघाडी व रेखाताई पागडे महिला आघाडी शहराध्यक्षा, शुभम नागापुरे युवा आघाडी शहराध्यक्ष आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
निवेदन पदयात्रेचे संकल्पना संयोजक उमेश ज. कडू शहर कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर यांनी सुत्र संचालन केले.
यावेळी सर्वप्रथम नगरपरिषद बल्लारपूर येथे मुख्याधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. न.पा मुख्याधिकारी यांच्या वतीने नगररचनाकार अक्षय राऊत यांनी निवेदन स्वीकारले, या निवेदनात मागणी करण्यात आली की जुनी नगरपरिषद परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची रंगरंगोटी करून सौंदर्यकरण तसेच दर्शनीय भागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा नामफलक येत्या १४ एप्रिल पूर्वी लावण्याची मागणी
प्रामुख्याने करण्यात आली.
त्यानंतर पदयात्रा पुढे निघाली जुनी नगरपरिषद परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी करण्यात आली की शहरामध्ये अतिशय वेगाने व कर्कश आवाजाने वाहने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात निवेदन देण्याकरिता गेले असता तेथे निवेदन या विभागाशी संबंधित नसल्याचे सहाय्यक अभियंता श्रेणी -१ यांनी सांगितले असून संबंधित विभागासाठी पुढील मार्गदर्शन करीत सहकार्याबद्दल आश्वस्त केले.
त्यानंतर पुढील निवेदन देण्यात करीता पदयात्रा तहसील कार्यालय बल्लारपूर येथे आल्यावर तहसीलदार त्यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदयांना प्रेषित निवेदनात मागणी करण्यात आली की, भारत देशात निवडणूक आयोग आजही दोन्ही पद्धतीने मतदान घेत आहे ईव्हीएम द्वारे तसेच पेपर बायलेट द्वारे परंतु पेपर बॅलेट सुशिक्षित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले जाते व
ईव्हीएमची बळजबरी फक्त सामान्य मतदारांवर करण्यात येते असल्याने अशी मागणी करण्यात येत आहे की सामान्य मतदारांनां सुद्धा मागणी केल्यास पेपर बायलेटचा पुरवठा करण्यात यावा, नाही तर ईव्हीएम मशीन बंद करून जुनी पेपर बायलेटची व्यवस्था पुर्ववत कायम करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या निवेदन पदयात्रेत वंचित बहुजन आघाडीचे राकेश पेटकरसर महसचिव सतीश नगराळे, प्रियंकेश शिंगाडे, वनमला भसारकर, प्रज्ञाताई नमनकर, सिद्धार्थ देशभरात, प्रभुदाजी देवगडे ,डी. वाय. नंदेश्वरजी, सुधाकर गेडाम, कुंजबिहारी बटघरेसर, मोनाली नंदेश्वर, स्वीटी लोंढे जोशीला वाघाडे, इंदुताई खरतर आदी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…