उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हा परिषद येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका ग्रामसेविकेने चक्क उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली आहे.
ग्रामसेविकेचे विनयभंग प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी व जिल्हा परिषद अध्यक्षा संगिता अढावू यांच्या दालनात पोहोचल्या नंतरही दोन्ही महिलांनी आपल्याला ठीक आहे असे म्हणून दाद दिली नसल्याची खंत तक्रारकर्त्या महिलेने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
प्राप्त माहितीनुसार, अकोला जिल्हा परिषदेत कार्यरत उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा अकोटचे गटविकास अधिकारी कालीदास रघुनाथ तापी व अकोल्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी व सध्या कार्यरत असलेले लिंबाजी बारगीरे (गटविकास अधिकारी रा. कळमपुरी, जि. हिंगोली) यांच्यावर एका ग्रामसेविकेने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांनी माझ्या कामाच्या ठिकाणी लैंगीक छळ केला असून व माझे जगणे खुप लाजीरवाने केलेले आहे असे म्हटले असून दोन्ही अधिकाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करून कामाच्या ठिकाणी माझा होणारा लैगीक छळ थांबवावा व त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सदर ग्रामसेवक महिलेने केली आहे.
विशाखा समिती करणार चौकशी: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्याकडे ग्रामसेवक महिलेने धाव घेत आपबिती सांगितली. यावेळी जिल्हा परिषेदचे माजी पदाधिकारी राजीव बोचे उपस्थित होते. घटनेतील एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असून तापी यांच्यावर अद्याप पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. पोलिस त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आपण चौकशी करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी तापी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामसेविकेने केली. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी हे प्रकरण विशाखा समितीकडे सोपवले असून चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…