हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा दि.16 जून:- यंग मेन्स बुदिस्ट वेलफेअर असोशीयन राजुरा येथील बुध्द विहार मध्ये 10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व प्रथम तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार, मेणबत्ती अगरबती प्रजलित करून व सामूहिक त्रिशरण पंचशील घेवून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले त्यानतंर भारतीय बौध्द महासभा राजुरा तालुका अध्यक्ष धर्मुजी नगराळे सर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व प्रथम संदीप सोनोने सरचिटणीस चंद्रपूर यांनी उद्घाघाटन करून आपले विचार मांडले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय घाटे सर्जन वैधकीय अधिकारी तथा अध्यक्ष बहुजन समता पर्व चंद्रपूर, अँड. दीपक चटप चेव्हनींग स्कॅलर लंडन (युके), अशोक घोटेकर महाराष्ट्र राज्य संघटक तथा विदर्भ प्रदेश अध्यक्ष भा. बौध्द महा, इंजि. भूषण फुसे सामजिक कार्यकर्ता, शेषराव साहारे उपाध्यक्ष, रविंद्र खैरे, उत्कर्ष गायकवाड, अमोल राऊत, कैविसताई मेश्राम, गुरुबालक मेश्राम, प्रफुल भगत इत्यादीनी गुणवंतांना विद्यार्थांना सविस्तर मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्यानतंर भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्यामध्ये बौध्द धमाच्या प्रचार प्रसार करण्याकरिता मदत केले तशेच राजुरा तालुक्यातील सर्व शाळानमधून व कनिष्ठ महाविद्यालय मधून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या 10 वी आणि 12 वी गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, फाईल, पेन, पुस्तक देऊन राजुरा तालुक्याच्या पदाधिकारी कडून सत्कार करण्यात आला.
यावेळी विशेष उपस्थित मध्ये गौतम चौरे सरचिटणीस, गौतम देवगडे कोष्याध्यक्ष, प्रभाकर लोखंडे, मुरलीधर ताकसांडे, इजि .राहुल भगत, पुरुसोत्तम वनकर, किसन बावणे, मंदाकिनी दुधे, सुजाता नळे, गायत्रीताई रामटेके, पंचशिला वेल्हे, संगीता शेंडे, मेघाताई बोरकर, किरण खैरे, वंदनाताई देवगडे, कमल टेकाडे, समता सैनिक दल चे सैनिक कमांडर साक्षी नळे या सैनिक नी चांगली सेवा दिली व उपस्थिती होते
या कार्यक्रमाचे स्वागत गीत अशोक दुबे अध्यक्ष ग्राम शाखा रामपुर यांनी स्वागत गीत सुंदर आवाजा मध्ये गायले. तर या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा.दिनेश घागरगुंडे राजुरा तालुका संघटक यांनी केले आणि उत्कृष्ट संचालन गौतम रत्ने यानी केले तर आभार प्रदर्शन इंजी. राहुल भगत ग्राम अध्यक्ष गोवरी यांनी केले शेवटी सरण्यत घेण्यात आले. चाय व बिस्कुट देवून या कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातील सर्व मुले, मुली, आई, वडील इत्यादी बहु संख्येने उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…