प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला त्यात समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव शिवणी येथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक गोर-गरीब घराचे छप्पर उडाले असून वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. लोकांच्या घराचे छत्र उड्याल्याने व घरात पाणी शिरल्याने अन्न धान्य, विद्यार्थ्यांचे शालेय पुस्तक, पाण्याने पूर्ण पणे ओले झाले आहे. तसेच या वादळी वाऱ्यामुळे मोठ-मोठे झाडे पडून गोरगरीब लोकांच्या घराचे प्रचंड मोठा प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी शिवनी या गावातील घराची पाहणी करून तहसीलदार यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून नुकसानग्रस्त घरांचे तात्काळ पंचनामे करून २४ तासाच्या आत आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली. यावेळी पाहणी करताना गावातील उपसरपंच अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदीले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अनिल देशमुख, महादेव वांदिले, अमोल बोरकर, तुषार थूटे, अनिल आडकिने उपस्थित होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…