मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.18 जून:- पोलिस दल आणि पोलिस दलातील कर्मचारी बहुतकरून कौतुकापेक्षा टीकेचे धनी होत आले आहेत. यात त्यांचा संवेदनशील, कार्यतत्पर आणि समाजाभिमुख चेहरा अभावानेच समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर नित्याच्या कर्तव्यापलीकडे जाऊन बांधिलकी जपणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या कर्तृत्वाचा अशाच प्रसंग हिंगणघाट येथून पुढे आला आहे.
कुणाल सातारकर रा. सुलतानपूर यांनी 112 मदत केंद्रावर फोन करून हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली की, ते हिंगणघाट वरून सुलतानपूर गावाकडे दुचाकी मोटर सायकल ने परत जात असता त्यांचा मोबाईल कुठेतरी पडला आहे व मोबाईलच्या कव्हरच्या मागे तीन हजार रुपये रोख आहे अशी माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे 112 पथकात काम करत असलेले पोलीस हवालदार प्रवीण बोधाने, पोलीस शिपाई संदीप उईके यांनी सायबर सेल वर्धा येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार अनुप कावळे यांच्या मदतीने हरवलेल्या इसमाचा मोबाईलचे लोकेशन काढून मोबाईल लोकेशनचा आधारे मोबाईलचा शोध घेऊन कुणाल सातारकर यांना पोलीस स्टेशनला बोलाऊन हरवलेला मोबाईल व तीन हजार रुपये रोख रक्कम त्यांना परत केले.
कुणाल सातारकर यांनी त्यांचा मोबाईल व पैसे परत मिळतात पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील ठाणेदार प्रवीण मुंडे, पोलीस हवालदार प्रवीण बोधाने, पोलीस शिपाई, संदीप उईके, महेंद्र गायकवाड, भूषण भोईर यांचे आभार मानले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…