अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय वर्धा, नगर परिषद, हिंगणघाट आणि महिला पतंजली योग समिती, हिंगणघाट जि. वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जे. आर. निखाडे लॉन व सभागृह हिंगणघाट येथे “जागतिक योग दिन” निमित्त काउंट डाऊन योगा डे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
महिला सशक्तीकरणासाठी योगा या विषयावर आधारीत या विशेष कार्यक्रमाला केंद्रीय संचार ब्युरो वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, नगर परिषद हिंगणघाटचे प्रशासकीय अधिकारी संतोष जकवाड, नगर परिषद हिंगणघाटचे अभियंता अनिल नासरे, महिला पतंजली योग समिती जिल्हा वर्धाच्या जिल्हा प्रभारी पौर्णिमा विजय धात्रक, पतंजली चिकित्सालय हिंगणघाट चे संचालक दिपक भुतडा, योगसाधक प्रा. चंद्रशेखरजी रेवतकर प्रामुख्याने उपस्थित होते.
काउंट डाऊन योगा डे निमित्ताने क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री. राऊत यांनी योगसाधकांना योगा विषयी माहिती विशद करून मार्गदर्शन केले. योग प्रशिक्षक पौर्णिमा धात्रक यांनी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त होणाऱ्या प्रोटोकॉलचे प्रात्यक्षिक योग साधकाकडुन करून घेतले. तसेच शिबिरामध्ये योग, प्राणायम, सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देण्यात आले व प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच सर्व योगसाधकाची मोफत आरोग्य तपासणी डॉक्टर दिपिका जयस्वाल, पतंजली चिकित्सालय, हिंगणघाट यांनी केली. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नितीन सुकळकर यांनी केले.
योग कार्यक्रमात नगर परीषद येथील अधिकारी व कर्मचारी, निखाडे भवन, साई मंदीर, रिठे कॉलनी, गोरक्षण योग कक्ष, हनुमान मंदिर शास्त्री वार्ड, शिवराई कक्ष, बिडकर वार्ड कक्ष, विवेकांनद कक्ष येथील साधक व साधिका उपस्थित होते. तसेच अभिनव विचार मंचचे सदस्य, शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सहभागी होणा-या नागरीकांना योगाभ्यासाचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पौर्णिमा धात्रक, प्राची पाचखेडे, सुषमा खोडे, शितल राऊत, निता दरवरे, सुनीता गंगवार, पिंकी ठाकूर, प्रज्ञा मानकर, लता चौखे, सुनीता साठवणे, आरती पांढरे, सुरेखा तिजारे, इंदिरा तडस, कल्पना बिटे, मिनाक्षी कारवटकर, विजय धात्रक, राहुल वंजारे, रंजीत जिवने, नितीन सुकळकर, चंदू रेवतकर, प्रसाद पाचखडे, मोहन निनावे, विकास नागरकर, महेंद्र पर्बत, पंढरी तडस, यादव कोटरकर, ओमप्रकाश मुळे, अजय बिरे, किशोर कुंभलकर, बाबाराव मस्कर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…