अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- 18 जून ला हिंगणघाट शहरतील आदर्श नगर येथे विद्युत ट्रांसफार्मर मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने परिसरातील अनेक ग्राहकांच्या घरातील दूरचित्रवाणी संच, एलईडी एलसीडी टीव्ही, पंखे, फ्रिज, इनव्हर्टर, ट्यूबलाईट लॅपटॉप, मोबाईल, हिटर, फिल्टर यासारखी विद्युत उपकरणे जळाली. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले.
सध्या पावसाळा सुरू असल्याने वीज यंत्रणेतील बिघाडांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात पूर्वी वीज महावितरण कंपनीने विद्युत ट्रांसफार्मर सह वीज पुरवठा करणारे इतर साहित्य दुरस्ती करून नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. पण वीजबिल वेळेत न भरल्यास कारवाईसाठी तत्परता दाखवणारे महावीतरणचे अधिकारी, कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करत असतात त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. मुळात ट्रांसफार्मर मध्ये शॉर्ट सर्किट होण्यात नागरिकांची चूक कशी होऊ शकते, असा नागरिकांंचा सवाल आहे.
या वर नागरिकांनी विद्युत कार्यकारी अभियंता यांच्या कडे तक्रार करून झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी केली. परंतु विद्युत अभियंता शहरी विभाग यांनी नैसर्गिक आपदा मुळे हे घडले आणि विद्युत विभागाच्या चुकीमुळे हा प्रकार झाला नाही, असे म्हणून हाथ वरती केले. परंतु नागरिकांच्या झालेल्या नुकसानीस कौन जवांबदार? हा प्रश्न विचारल्या जात आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…