जळगाव जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जामनेर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे जमावाने पोलीस स्टेशनवर हल्ला करत पोलीस स्टेशनची तोडफोड करत पोलीस निरीक्षक यांच्यासह अनेक पोलिसांना जखमी केले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली आहे.
जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा गावातील 6 वर्षीय बालिकेवर एका नराधमाने चिंचखेडा शिवारात अत्याचार केला. त्यानंतर तिची निर्घृण हत्या करुन त्याने पलायन केले होते. या नराधमाला गुरूवारी (दि.२०) भुसावळ येथून पोलिसांनी अटक केली. सुभाष इमाजी भिल वय 35 वर्ष रा. वावडदा, ह.मु. चिंचखेडा, ता. जामनेर) असे या नराधमाचे नाव आहे. त्याला अटक केल्याची माहिती मिळताच आरोपी आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्री 10.30 वाजताच्या दरम्यान घडली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या 10 ते 12 नागरिकांवर धडक कारवाई करत रात्रीच ताब्यात घेतले आहे.
यावेळी संतप्त जमावाने पोलीस स्टेशनवर दगड फेक केली. त्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह 10 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. दगडफेकीनंतर पोलीस स्टेशन आवारात दगडाचा खच पडलेला दिसून आला. दरम्यान जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव शांत होत नव्हता. जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या. संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली, अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली.दोन पोलिस गंभीर जखमी जखमी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या दगडफेकीत रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड, मुकुंदा पाटील हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
जामनेर तालुक्यातील एका 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नऊ दिवसापूर्वी घडली होती. या घटनेतील नराधम हा फरार झालेला होता. त्याला गुरुवारी दि. २० जून रोजी पोलिसांनी शिताफीने भुसावळ तालुक्यात तापी नदीच्या जवळ ताब्यात घेत अटक केली आहे. नराधमाला अटक झाल्याची माहिती जामनेर शहरात पसरताच मोठा जमाव एकत्र झाला. त्यांनी महामार्ग रोखून चौकात टायर जाळत घटनेचा निषेध केला. तसेच नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली.
या वेळेला पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर संतप्त जमाव जामनेर पोलीस स्टेशनकडे आला. त्यांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत प्रचंड तोडफोड केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिसांवर दगडफेक केली. त्यात शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाले आहेत. तसेच काही नागरिकही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती वरिष्ठांकडे गेल्यानंतर दंगा नियंत्रण पथकाला जामनेर शहरांमध्ये पाचारण करण्यात आले होते.घटनेमुळे जामनेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…