उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने मेहकर येथे पोलीस निरीक्षक मेहकर यांना तथागत ग्रुपचे संदिप गवई यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.
जातीय भेदभाव व धार्मिक आंबेडकरी चळवतील सर्व जनतेच्या भावना दुखवल्या आहेत. प्रथमेश दादा, संदिप चव्हाण हिंदु युवा वाहिनी शहराध्यक्ष नाशिक यांनी आसे पत्राद्वारे सांगत आहे की, काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य शूद्रांना ताकीद देण्यात येते की मंदिरा जवळ कुठेही तुमचा निळा, पिवळा झेंडा लाऊ नये तसे केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईन हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळाराम मंदिर सारख्या पवित्र ठिकाणी महारानी जे भीमटे स्तंभ उभारले आहे ते तात्काळ काढून टाकावे. मंदिराच्या चारही दरवाजावरुन ये जा बंद करणे चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू श्रीरामाच्या धरतीला मलिन करू नये तसे दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहावे. जो कोणी परत निळा हातात घेऊन दिसला तरी त्याला वाळीत टाकण्यात येईल. सर्व कट्टर हिंदूंनी शूद्र जाती सोबत मांग महार ढोर चांभार इत्यादी ना आपल्या घरी बोलवू नये त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये. त्यांचा स्पर्श होऊ देऊ नये आशा पध्दतीने प्रथमेश दादा, संदिप चव्हाण हिंदु युवा वाहिनी शहराध्यक्ष नाशिक या व्यक्तीने पेपरच्या माध्यमातुन धार्मिक भावना दुखावुन आणि ज्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी धर्मविरोधी पोस्ट आणी या प्रकारे पॉमप्लेट छापण्यात आले आहे. तरी आपण या इसमावर ॲट्रोसिटी ॲक्ट १९८९ नुसार कार्यवाही करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने देत आहे.
यावेळी सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई,कुणाल माने,गजानन सरकटे, प्रकाश सुखधाने, राधेशाम खरात, देवानंद अवसरमोल, अख्तर कुरेशी, दुर्गादास अंभोरे, संदिप राऊत, गौतम पेठणे, रमेश गवई, गौतम नरवाडे, सचिन गवई, श्रीकृष्ण शेटाणे महिला आघाडी निताताई पैठणे, कांचन मोरे, वंदना माने, प्रतिभा गवई, जाकेरा बी शेख सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…