प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 24:- जागतिक योग दिनानिमित्त आज सामान्य रुग्णालयातील आयुष विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील वानखेडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. संजय गाठे, मेट्रन इंदिरा शेंडे, नर्सिंग अधिकारी जयश्री मिसाळ, समन्वयक विजय ओझा, हर्षल ढोबळे, अधिपरिचारिका श्रीमती तडस, प्रविण गावंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी आयुष विभागाचे योग शिक्षक डॉ. शंकर तायडे यांनी उपस्थितांना योग प्रात्याक्षिके करुन आसने करुन घेतली. यावेळी डॉ. सचिन तडस यांनी उपस्थितांना योगदिन व दैनंदिन जिवनातील योगाचे महत्व सांगितले. तसेच आयुष विभागात नियमित सकाळी 9 ते 10 वेळात सुरु असलेल्या योग वर्गाचा कर्मचारी, अधिकारी व रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तर डॉ. संजय गाठे यांनी तणावमुक्तीसाठी योग व या योगदिनाचे घोषवाक्य स्वयं व समाजाकरीता योग याचे महत्व पटवून दिले.
योग सप्ताहातंर्गत डॉ. शंकर तायडे यांनी महिला सशक्तीकरणाकरीता योग, तणावमुक्ती करीता योग, वार्धक्याकरीता योग, महिला आरोग्य व योग, सुदृढ आयुष्य व मानसिक स्वास्थाकरीता योग या संबंधीत व्याख्याने घेण्यात आले. तसेच योग दिनामित्त आयुष विभाग परिसरात डॉ. सचिन तडस यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
याकार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आयुष अधिकारी डॉ. योगिता भेंडे यांनी केले तर आभार डॉ. शंकर तायडे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. सिमा लोहकरे, डॉ. आश्विनी डोणे, डॉ. अनुपमा जनईकर, डॉ. रेहान खान, श्याम ठाकरे, अरुणा भागवत, मनिषा कलवडे, प्रमोद इटनकर इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नर्सिग स्कुलच्या विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर…