वृक्षमित्र परिवाराच्या निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल, एस. एस. एम. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकाकडून नगर परिषद हिंगणघाट ने केला दोन लाख रुपये दंड वसूल
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील नामांकित एस.एस.एम. कन्या विद्यालयामध्ये मुख्याध्यापकांच्या आदेशाने विनापरवानगी 8 वृक्षांची अमानुषपणे कत्तल केल्याचे वृक्षमित्र परिवाराच्या निदर्शनास आल्याने वृक्षमित्र परिवाराने मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगणघाट यांना निवेदन देऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली परंतु नगर परिषद प्रशासनाने कारवाई संथगतीने केल्यामुळे वृक्षमित्र परिवाराने जिल्हाधिकारी वर्धा यांचेकडे तक्रार केली होती.
जिल्हाधिकारी यांना तक्रार प्राप्त होताच तात्काळ हिंगणघाट नगर परिषदचे मुख्याधिकारी यांच्याशी फोन द्वारे संपर्क करून सदर मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. नगर परिषदेने झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अन्वये कारवाई प्रस्तावित करून मुख्याध्यापकास 25 हजार रुपये प्रती झाडाप्रमाणे एकूण 2 लाख रूपये दंड देण्यात आला. आणि अधिनियम 1975 कलम 21 गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये या बाबत खुलासा मागविण्यात आला. संबधित मुख्याध्यापकांनी 24 जून ला नगर परिषद मध्ये 2 लाख रुपये धनादेशाद्वारे दंड भरला.
सदर कारवाईमूळे अमानुषपणे वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होईल व वृक्षतोडीस आळा बसेलअसा विश्वास ठेवीत नगर परिषद प्रशासनाने केलेल्या कठोर कारवाई बद्दल वृक्षमित्र परिवार व पर्यावरण प्रेमीने समाधान व्यक्त केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…