संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हात आदीवासी. वि.का. सहकारी संस्था देवाडा च्या संस्थेच्या व्यवस्थापकाने परिसरातील अनेक शेतकऱ्यांना फसविल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हात आदीवासी. वि.का. सहकारी संस्था देवाडा प्रकाशझोतात आहे. पण आरोपी संस्थेच्या व्यवस्थापक जगन दुर्गे यांना सहकार विभागाकडुन वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्याने केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
आदीवासी. वि.का. सहकारी संस्था देवाडा या संस्थेच्या जगन दुर्गे हे व्यवस्थापक पदावर काम करीत असतांना त्यांनी व सरपंच यांनी बनावट कागदपत्राचे आधारे विठठल महादु मेश्राम यांचे नावाने पिक कर्जाची उचल करून अफरातफर केल्यामुळे संबंधीत शेतक-याने तकार केली असता तकारीची दखल घेतली नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतक-याने मा. न्यायालयात धाव घेतली व मा. न्यायालयाचे आदेशानुसार श्री. जगन दुर्गे व सरपंच यांवेवर पोलिस स्टेशन राजुरा येथे भा.द.वि. कलम ४०६, ४२०, ४६५, १२० बी, ४६८ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे व व्यवस्थापक जगन दुर्गे फरार आहेत.
संस्थेचे व्यवस्थापक जगन दुर्गे यांचेवर कार्यवाही करून चौकशी करण्याकरीता सदर शेतक-यांने दि. ५ जून रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर, सहा. निबंधक तालुका राजुरा यांचेकडे तकार करून १५ दिवसाचा कालावधी होउनही अजुनपर्यंत व्यवस्थापक जगन दुर्गे यांचेवर कार्यवाही करण्यांत आलेली नाही. त्यामुळे सहकार विभागाकडुन भ्रष्टाचारी व्यवस्थापकाला वाचविण्याचे प्रयत्न होत असल्याची शंका उत्पन्न होत आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष दिसून येत असून सामान्य शेतक-याला न्याय मिळावा व सहकार विभागाने व्यवस्थापकावर त्वरीत कार्यवाही करावी. अशी मागणी आता होवू लागली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…