मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यात पाटबंधारे विभागाअंतर्गत विना परवानगीने सुरू असलेले अवैध बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या या बांधकामाबाबत काही नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले. कंकडालवार यांनी हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची शहानिशा केली असून या कामांची पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
झालेल्या कामापैकी अनेक कामे तीन वर्षांपूर्वीची आहेत. त्या कामांची आणि सध्या चालू असलेल्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार होत आहे. तीन वर्षापूर्वी बांधलेले काही बंधारे पहिल्याच पावसात वाहून घेले तर काही बंधारे क्रॅक झाले आहे. प्रशासनाचे यावर कोणतेही लक्ष नाही. त्याकरिता तीन वर्षापूर्वी झालेले सर्व बंधाऱ्यांच्या कामांची आणि सध्या चालू असलेल्या बंधाऱ्यांच्या बांधकामांची संपूर्ण चौकशी करावी, अन्यथा पाटबंधारे कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अजय कंकडालवार यांनी दिला आहे.
पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या कोट्यवधीच्या बंधाऱ्यांच्या कामांचा नित्कृष्ट दर्जा आहे. शासनाच्या नियमानुसार बरोबर खोलीकरण होत नाही. जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…