प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.25:- नगर पालिका हिंगणघाट नगरोत्थान महाअभियान सन 2023 – 2024 हिंगणघाट शहरातील दुसऱ्या टप्प्यातील विविध विकास कामांचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
त्यात संत ज्ञानेश्वर वार्ड प्रभाग क्र. 4 मध्ये सर्व क्र. 15/5 मधील भाईमारे ले-आऊट येथील मोकळ्या जागेमध्ये अवतार मेहेर बाबा मंदिराला वॉल कंपाऊंडचे बांधकाम करणे.
संत ज्ञानेश्वर वार्ड प्रभाग क्र. 4 येथील शेत सर्व्हे नं. 87/1 मधील खुल्या जागेमध्ये असलेल्या समाज मंदिर व अंगणवाडीला वॉल कंपाऊंडचे बांधकाम करणे.
संत ज्ञानेश्वर वार्ड प्रभाग क्र. 4 मध्ये (लोंढेकर ले-आऊट मधील) श्री. सातपुते व चकोले यांचे घराजवळील ओपन स्पेस ला वॉल कंपाऊंडचे बांधकाम करणे.
गौतम वार्ड प्रभाग क्र. 9 मध्ये जुना बस स्टॅन्ड मागील समाज भवन परिसराला वॉल कंपाऊंडचे बांधकाम करणे.
भिमनगर वार्ड प्रभाग क्र. 1 मध्ये (सिवरेज ट्रिटमेंट प्लान्ट जवळील) दाऊदी बोहरा कब्रस्तान करीता ॲप्रोच रोडचे बांधकाम करणे व पेव्हीग ब्लॉक बसविणे.
संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्र. 5 साखरकर ले-आऊट व व्यंकटेश नगर मधील श्री. भानुदास इंसनकर ते श्री. बावणे ते नंदोरी रोड (मयंक पान सेंटर पर्यंत सिमेंट कॉक्रीट नालीचे बांधकाम करणे.
डॉ. मुजुमदार वार्ड प्रभाग क्र. 12 मधील गंगा माता मंदीर परीसरामध्ये प्रसाधन गृहाचे बांधकाम करणे.
निशानपुरा वार्ड प्रभाग 11 मध्ये स्मशानघाट रस्त्यावरील सार्व. हनुमान मंदिराच्या मोकळया जागेला वाल कंपाऊंड बांधकाम करणे व पेव्हिंग ब्लॉक बसविणे.
हिंगणघाट शहरातील अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, शहर अध्यक्ष भूषण पिसे, कार्याध्यक्ष संजय माडे, सुभाष कुंटेवार, सुनील डोंगरे यांच्यासह शहरातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…