मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरील अवजड वाहतूकीमुळे या मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे दुर्घटनेचा संभाव्य धोका लक्षात घेत जिल्हाधिका-यांनी अवजड वाहनास या मार्गावरुन वाहतूक करण्यास मज्जाव करीत तसे निर्देश दिले होते. मात्र असे असतांनाही सदर मार्गावरुन राजरोसपणे अवजड वाहने दुमटली जात आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिका-यांद्वारेही (आरटीओ) या वाहनांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने वाहतूकदारांची मूजोरी अधिकच वाढली आहे.
सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे या मार्गाची अक्षरश: दैनावस्था झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे तसेच अवजड वाहनांच्या रेलचेली मुळे या मार्गावर घडून आलेल्या अपघातात दोन डझनभर निष्पापांचे बळी गेले आहेत. यामुळे संबंधित अवजड वाहतूकदारांसह प्रशासनाप्रती आक्रोश वाढला होता. जनआक्रोश लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनेची शक्यता लक्षात घेत 19 ऑक्टोबर 2024 पासून 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतूकीस प्रतिबंध घातले होते.
सदर कालावधीपर्यंत पर्यायी मार्गही सुचविला. या आदेशाची अंमलबजावणी न केलेल्या वाहतुकदारांवर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले होते. मात्र जिल्हाधिका-यांच्या निर्देशानंतरही राजरोजपणे या मार्गावर अजवड वाहनांची वर्दळ सुरुच आहे. यामुळे रस्त्यांची पुन्हा दैनावस्था होण्यासोबतच अपघाताचीही शक्यता बळावली आहे. एरव्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिका-यांद्वारे नियम मोडणा-या अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात असतो. सदर राष्ट्रीय महामार्गावर धावणा-या अवजड वाहनांवर कोणतीही कारवाई न झाल्याने या वाहतूकदारांना संबंधित अधिका-याने अभय दिले आहे, का असा प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्हाधिका-यांनी 31 ऑक्टोबर पर्यंत आलापल्ली – रेपनपल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर अजवड वाहतूकीस बंदीचे सक्त निर्देश दिले आहेत. मात्र अद्यापही या मार्गावर राजरोसपणे अवजड वाहतूक सुरुच आहे. एरव्ही नियम मोडणा-या वाहनधारकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयीन अधिका-यांद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र संबंधित राष्ट्रीय महामार्गावर सर्रास अवजड वाहनांची वाहतूक होत असतांना कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित अधिका-याने अवजड वाहतूकीदारांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…