योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- मध्यप्रदेशात प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय ठरलेल्या ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ योजना राबवण्याची मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली होती. त्या अनुषंगाने आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना महाराष्ट्र शासनाने घोषित केली असून याकरिता आवश्यक निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य नागरिकांच्या हिताच्या हा अर्थसंकल्प होता. दरम्यान, पंकजा मुंडे भाजपच्या मध्यप्रदेशात सह प्रभारी असल्याने या राज्यात महिलांसाठी लोकप्रिय ठरलेली ‘लाडली बहना’ योजना आपल्या महाराष्ट्रात देखील लागू करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे वारंवार केली होती, त्यांच्या या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने आजच्या अर्थसंकल्पात २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रूपये देणारी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजना लागू करण्याची घोषणा केली. एवढेच नव्हे तर यासाठी निधीची तरतूद देखील केली आहे. ही योजना लागू झाल्याने राज्यातील तमाम महिला वर्गात आनंद व्यक्त होत असून महिलांनी पंकजाताईंच्या मागणीला यश आल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…