राजाराम पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी साहेबराव कसबेवाड यांच्या मार्गदर्शनातून कृषी मेळावा संपन्न.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या राजाराम (खांदला) येथील आज दिनांक 30 जून रोजी उप पोलीस स्टेशन राजाराम खा. च्या वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून निलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली, कुमार चिंता (अपर पो. अधीक्षक प्रशासन), यतीश देशमुख (अप्पर पो. अधीक्षक अभियान) गडचिरोली, एम. रमेश अपर पोलीस अधीक्षक (प्राणहीता) अहेरी, यांच्या संकल्पनेतून व अजय कोकाटे उपविभागीय पोलिस अधिकारी प्राणहिता अहेरी यांच्या माध्यमातून राजाराम खा. येथे भगवान बिरसा मुंडा भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते,
राजाराम खा. हद्दीतील गाव पाटील तसेच श्री. चव्हाण कृषी परिवेषक अहेरी, भास्कर तलांडे माजी पंचायत समिती सभापती अहेरी, रोशन कंबगौनिवार उप सरपंच राजाराम, पोस्टेचे प्रभारी अधिकारी साहेबराव कसबेवाड, पोउपनि मोरणकर सीआरपीएफ जालना यांचे उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
तसेच प्रभारी अधिकारी साहेबराव कसबेवाड यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी श्री. चव्हान यांनी शेतीपयोगी मिळणाऱ्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. सदर मेळाव्यात राजाराम खा.हद्दीतील दुर्गम अतिदुर्गम अशा कोरेपली, कवठराम, पत्तिगाव, या गावातील शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे शेतीउपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. सदर मेळाव्यात 200 ते 250 नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांची जेवणाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली व सदर मेळाव्याचे सांगता करण्यात आले.
यावेळी अनेक शेतकरी, मजूर, कामगार आणि नागरिकांना विविध साहित्य वाटण्यात आले. त्यात 1) धान बॅग 20 नग 2) कीटकनाशक 100 नग 3) फावडे 20 नग 4) तूर बियाणे परमिट 20 5) छत्री -20 6) मुलांना वही पेन -100 शासकीय दाखले- 7) आधार कार्ड दुय्यम वाटप – 30 8) ई-श्रम कार्ड – 35 9) सा-बारा – 30 10) आभा कार्ड – 50
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…