युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आंबेडकरी समाजासाठी प्रेरणास्रोत असलेल्या दीक्षाभूमी एका वेगळ्या कारणाने प्रकाश झोतात आली आहे. सध्या दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राऊंड पार्किंगचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाने या अंडरग्राऊंड पार्किंगचे मोठ्या प्रमाणात विरोध सुरू असताना आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू असताना आता दिक्षाभूमी वर आता नागरिकांना प्रवेश बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दीक्षाभूमी बचाव म्हणून नागपुरात मोठे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलनाने अगदी उग्ररूप धारण करू शकतो या भीती पोटी पोलिसांनी दीक्षाभूमी परिसर ताब्यात घेतला असून विशेष म्हणजे, राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी मागविण्यात आली आहे. दीक्षाभूमीकडं येणाऱ्या सर्वच मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. कुणाला ही ओळखपत्रा शिवाय दीक्षाभूमीकडं सोडण्यास मनाई करण्यात आलीय. सोबतच दीक्षाभूमीचं मुख्य प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आलं आहे. कोणालाही दीक्षाभूमीमध्ये प्रवेश देण्यास बंदी करण्यात आली आहे.
दीक्षाभूमी वरील बेकायदा आणि अनावश्यक पार्किंग लॉट ही कमर्शियल कॉम्प्लेक्स उभी करण्यास अडथळा निर्माण होवू नये म्हणून सरकारने आता पोलिसांना पुढे केले आहे असे दिसते. एकीकडे सरकारने या कामावर स्थगिती दिल्याची घोषणा केली आहे. तर दूसरी कडे झालेल्या आंदोलनासाठी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आंदोलकांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील आणि वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या अनुयायांचा समावेश होता. त्यांनीच आंदोलनस्थळी येऊन स्थानिकांच्या भावना भडकावल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे, असा दावा पोलीसांनी केला आहे. त्यामुळे आता या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दीक्षाभूमी आंदोलकांवर गंभीर गुन्ह्याची नोंद !
दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंग प्रकरणात बजाज नगर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले असून गैर कायद्याची मंडळी जमवून आंदोलन आणि जाळपोळ केल्याचा पहिला गुन्हा दाखल केला आहे. तर गैरकायद्याची मंडळी जमवून ठार मारण्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा आरोप अत्यंत गंभीर आणि आंदोलन करणारे आंबेडकरी अनुयायी ह्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव आहे. आंदोलक कुणाचा तरी खून करायला गेले होते हा आरोप लावला जाणे अत्यंत बालिशपणा वाटत असला तरी आंदोलकांना मोठया गुन्हात अडकवून ट्रस्ट आणि नागपुर सुधार पन्यास व सरकारला समाज कल्याणचा पैसा कमर्शियल कॉम्प्लेक्स वर खर्च करण्यासाठी भाजप नेते ह्यांनी पुढाकार घेतला आहे असे दिसते.
अर्थात पोलीस जाणीवपूर्वक नवी स्टोरी क्रियेट करीत आहेत. आंदोलन उभे झाले ते स्थानिक पातळीवर, स्थानिक अनुयायी आणि संघटना ह्यांनी बेकायदा ट्रस्ट पदाधिकारी ह्यांचे सोबत बैठका घेऊन कमर्शिअल बिल्डिंग रद्द करण्याची मागणी केली होती. विशेषत: महिला अनुयायी आघाडीवर होत्या. असे असताना पोलीस मात्र नवा अँगल आणून नाहक वाद वाढवत आहेत. पोलीस गंभीर गुन्हे दाखल करीत असतील तर नागपुरातील आंबेडकरी वकील मंडळींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आहे. दाखल केलेला खुनाचा प्रयत्न ह्या एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करून आंदोलकांना कायदेशिर मदत करण्यास पुढाकार घ्यावा.
दिक्षाभूमी पुनर्विकास योजना ह्याला कुणीही विरोध केलेला नाही तर मूळ वाद आहे तो पार्किंग लॉट चे नावावर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे करून त्यामुळे दिक्षाभूमी स्तूप आणि बोधीवृक्ष ह्यास निर्माण होणारा धोका. बोगस ट्रस्टी आणि भाजप जनप्रतिनिधी आणि रेशिमबाग मधील काहीचे साटेलोटे असल्याने तातडीने पोलिसाकरवी दिक्षा भूमी वर प्रवेश बंदी घातली गेली आहे. अशी भावना आंबेडकरी समाजाने व्यक्त केली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…