अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ५ जुलै:- धनुज फाऊंडेशन नागपुर तर्फे स्व.श्री. नागोरावजी मोवाडे विद्यालय आग्रा, मोवाडे पब्लिक स्कूल नांदागोमुख, गोमुख विद्यालय नांदागोमुख, श्रीराम विद्यालय नांदागोमुख, गोमुख विद्यालय तिष्टी, गोमुख विद्यालय पिपळा के. व सर्वोदय विद्यालय उमरी या सर्व शाळेतील १० व्या वर्गात शिकणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम मोवाडे पब्लिक स्कूल नांदागोमुख येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदिश जिवतोडे, अध्यक्ष राष्ट्रीय सेवक मंडळ नागपूर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राहूल तिवारी सभापती पंचायत समिती सावनेर, गोविंदराव ठाकरे सदस्य पंचायत समिती सावनेर, प्रमुख उपस्थिती नंदलालजी मोवाडे सरपंच ग्रामपंचायत आग्रा, कांतारामजी भोयर माजी सभापती कृ.बा. समिती सावनेर, धर्मेंद्र खोंडे सरपंच ग्रामपंचायत माळेगांव, मोरेश्वर जिवतोडे अध्यक्ष धनुज फाऊंडेशन नागपूर, अविनाश ताजने सचिव धनुज फाऊंडेशन,
गणेश ताजने सहसचिव, चंदशेखर चांदेकर मुख्य समन्वयक/प्रसिद्धी प्रमुख, सौ.चित्रा डाखोळे मुख्याध्यापिका, सौ. प्रियंका आवारी, मोनाली भोंगाडे, मेघा भोंगाडे, पाचपुते सर, शिवकुमार मोहोड तसेच इतर शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते आर्थिक दुर्बल, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेपयोगी साहित्य वाटप. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर चांदेकर यांनी तर प्रास्ताविक मोरेश्वर जिवतोडे यांनी केले. गणेश ताजने यांनी सर्वांचे आभार मानले.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…