मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवस वर्धा जिल्हा आणि हिंगणघाट तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
यात दि 5 जुलै जाम जवळील चावरा या आश्रमात रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या मार्गदर्शनात आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवस दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी 6 वाजता बेवारस मनोरुग्ण यांची आस्थेने चौकशी करून या सर्वांना संपूर्ण जेवण ताट वाटीची पंगत करून देण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व मनोरुग्णांना सर्व प्रहारचे कार्यकर्ते गजू कुबडे, प्रहारचे जिल्हाप्रमुख सुरज कुबडे हिंगणघाटचे माजी शहर प्रमुख अजय लढी, हिंगणघाट शहर प्रमुख अतुल जाधव, जामचे माजी उपसरपंच अजय खेडेकर, नंदोरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य खोमलाल जगराह, यांनी केले. समाजाने दुर्लक्षित करून वाळीत टाकलेल्या या अभागी जीवांना दरवर्षी प्रहार तर्फे आ. कडू यांच्या तर्फे ताट वाटीचे जेवण देण्यात येते. ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी हिंगणघाटचे माजी शहर प्रमुख अजय लढी, हिंगणघाट शहर प्रमुख अतुल जाधव, जामचे माजी उपसरपंच अजय खेडेकर, नंदोरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य खोमलाल जगराह, सतीश गलांडे, मयूर पुसदेकर, रितेश गुडढे, सागर आत्राम, शेखर जामूनकर, आशिष कुबडे, धीरज नंदरे, अमोल वाघमारे, गणेश मांडवकर, तुषार उरकांदे, गोलू मन्ने, ईश्वर उताणे, करण विटाळे, अजय ठाकरे, तुषार उरकांदे, गुणेश टेंभरे, सुरज दादाजी कुबडे, वर्धा जिल्हाप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष हे उपस्थित होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…