अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ७ जुलै:- इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर शाखेतर्फे रविवारी ७ जुलै २०२४ रोजी आयएमए हॉल येथे “राष्ट्रीय डॉक्टर्स डे” निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठा उत्साह दाखवत सुमारे 80 युनिट रक्तदान करून हा कार्यक्रम यशस्वी केला.
इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर शाखेचे अध्यक्ष डॉ.विलास मानकर यांनी सर्व रक्तदात्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना भेटवस्तू व जीवनज्योती रक्तपेढी नागपूरचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजना बद्दल कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण चव्हाण व डॉ. प्राची भगत यांनी अथक प्रयत्न केले.
यावेळी आयएमए सावनेरच्या ज्येष्ठ सेवानिवृत्त सदस्या डॉ. सुजाता जयंत कुलकर्णी यांनी आयएमए आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अध्यक्ष डॉ. विलास मानकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. विजय धोटे यांनी डॉ. सुजाता जयंत कुलकर्णी व दिवंगत डॉ. जयंत कुलकर्णी यांच्या समाजसेवा कार्याचे सविस्तर वर्णन केले. त्यांचे आभार मानले.
आयएमएच्या सर्व उपस्थित सदस्यांचे उपाध्यक्ष डॉ. स्मिता भुडे व डॉ. परेश झोपे यांनी पुष्प देऊन स्वागत केले.
सावनेर शहरातील इयत्ता 10 वी राज्य शिक्षण मंडळ नागरी विभागात प्रथम आलेला सावनेर येथील शिजान अस्लम खान व इयत्ता 12 वी मध्ये प्रथम आलेला भालेराव विज्ञान महाविद्यालयातील कु. गौरी प्रभाकर चोरे यांचे पुष्पगुच्छ, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पालकांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. विजय घाटे, डॉ.रवींद्र नाकाडे, डॉ.अशोक जैस्वाल, आयएमएचे डॉ. ज्योत्स्ना धोटे, डॉ. संगीता जैन, डॉ. विनोद बोकडे, डॉ. करुणा बोकडे, डॉ.निलेश कुंभारे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. रवी ढवळे, डाॅ. सचिन घटे, डाॅ.जयंत कडसकर, डॉ. आशिष चांडक, डाॅ. रेणुका चांडक, डाॅ. सोनाली कुंभारे डाॅ. गौरी मानकर, डाॅ. नितिन पोटोडे, डाॅ. मोनाली पोटोडे, डाॅ. रशमी भगत, डाॅ. इशरत जावेद, डाॅ. जयराज हाडके, डॉ. अमित चेडे, डॉ. मिलिंद धर्माधिकारी, डॉ. दीपा धर्माधिकारी, निमा एसोसिऐशनचे अध्यक्ष डाॅ. संजय दोरखंडे उपस्थित होते.
यावेळी होमीयोपैथी एसोसिऐशन चे अध्यक्ष डाॅ. प्रशांत राजपूत, डॉ. के.आर.भगत, डॉ.स्वप्नील काळे, डाॅ.अनूप जैस्वाल, डाॅ. परेश पींगे, डाॅ.निरज दुबे, डाॅ. राहूल दाते, डाॅ.छत्रपती मनापुरे, डाॅ.गिरीश लाकडे, डॉ.आश्विन, डॉ. मर्फी गजभिये, डॉ. पराग घाटोड़े, श्री विनोद बोबडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय.एम.ए.चे सहसचिव डॉ.शिवम पुण्यानी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याची घोषणा व आभार प्रदर्शन डॉ.उमेश जीवतोडे यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…