उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली दि.८:- वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा संपर्कप्रमुख ‘संजय भूपाल कांबळे’ व त्यांचे सहकारी यांनी बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी मागण्यासाठी दिनांक ८ जुलै २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आवारात आमरण उपोषण करीत आहे आज आंदोलनाचा पहिला दिवस.
१) बांधकाम कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष कामगार मंत्री सुरेश खाडे हे बांधकाम कामगारांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेण्यास निष्कर्ष ठरत असल्याने त्यांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम ब कल्याणकारी मंडळ, मुंबई अध्यक्ष पदावरून तात्काळ हकालपट्टी करा. २) बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई कार्यकारिणीने तसेच कार्यालयातील अधिकारी यांनी अतिरिक्त केलेल्या खर्चाची व त्यांच्या वर्षानुवर्ष वाढ होत असलेल्या संपत्तीची ‘इडी’ मार्फत चौकशी करा.
३) बांधकाम कामगार मंडळात कामगार पुरवणारी खाजगी कामगार पुरवणारी कंपनी S2 यांची मुदत संपली असल्याने त्या ठिकाणी काम करण्यासाठी बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला कायम किंवा मानधन तत्वावर नोकरीला घ्या. ४) कोणतेही कारण नसताना कामावरून कमी केलेल्या, उच्चशिक्षित मागासवर्गीय मुलगी, रागिणी अशोक खिलारे यांना तात्काळ बांधकाम कामगार मंडळावर नोकरीस घ्या.
५) निवृत्त गट अ वर्ग अधिकारी यांची नियुक्ती करून, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ वेगळे स्वतंत्र कार्यालय सुरू करा. ६) बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या नातलगांची बोगस नोंदणी तात्काळ रद्द करा.
७) बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात बोगस नोंदणीकृत श्रीमंत बागायतदार, धनदांडगे नोकरदार यांची बोगस नोंदणी ची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. ८) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे सन 2022 – 23 तसेच 2023 – 24 या वर्षातील आर्थिक उलाढाल बाबत विशेष कमिटी स्थापन करून ऑडिट करा.
९) बांधकाम कामगारांच्या मुलांना फार्मसी तसेच नर्सिंग शैक्षणिक लाभाच्या रकमेत वाढ करा. १०) बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य संघ पुरविणारा ठेकेदार मफतलाल या कंपनीने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वितरणाचे करत असल्याने मफतलाल इंडस्ट्री ज लिमिटेड, मुंबई कंपनीचा ठेका तात्काळ रद्द करा.
११) बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राजकीय पक्षांच्या नेत्यांना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना इतर खासगी कंपन्यांच्या माध्यमातून देण्याचे कार्यवाही करू नका. १२) बांधकाम कामगारांना दिले जाणारे संसार उपयोगी भांडी संच व सुरक्षा साहित्य संचे वितरण हे मंडळाच्या देखरेखीखाली करा, राजकीय पक्षाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, राजकीय पक्षाचा फायद्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा व योजनेचा वापर केला जावू नये यासाठी खबरदारी घ्या.
१३) बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी KG ते PG पर्यंत चांगल्या दर्जाचे शिक्षण मोफत घेण्यासाठी तालुका निहाय शैक्षणिक संकुल स्थापित करा. १४) जिल्ह्याच्या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या उपचारासाठी तसेच मुलांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय स्थापित करा.
१५) जिल्ह्याच्या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी सर्व सोयीसुविधा नियुक्त शैक्षणिक वस्तीगृह उभे करा, त्याचबरोबर बांधकाम कामगारांना विविध संस्कृतीक कार्यक्रम घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी ‘बांधकाम कामगार संस्कृतीक भवन’ उभे करा. १६) बांधकाम कामगारांनी दाखल केलेले विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज काही अधिकारी हेतुपुरस्सर केवळ आर्थिक तडजोड करण्याच्यादृष्टीने रिजेक्ट करीत आहेत अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करून तसी नोंद त्यांच्या सेवा पुस्तकेत घ्या.
वरील प्रमाणे आमच्या मागण्या मान्य करून खऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावेत. तसेच सत्ताधारी राजकीय फायद्यासाठी मंडळाचा वापर बंद करावा राजकीय हस्तक्षेप थांबवा. या साठी मी पालकमंत्री तथा कामगार मंत्री, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,सांगली जिल्हा यांच्या दालना समोर आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी निर्माण केलेली एकमेव कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन घ्या मार्फत लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करीत आहे. तरी आमच्या मागण्या ताबडतोब माण्य करा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई, तसेच महाराष्ट्र राज्य शासन जबाबदार असाल यांची नोंद घ्यावी ,असा इशारा, उपोषण करते संजय भूपाल कांबळे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्कप्रमुख यांनी प्रशासनाला दिला आहे.
यावेळी, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, पश्चिम महाराष्ट्र राज्य महासचिव प्रशांत वाघमारे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, जिल्हा संघटक नितीन सोनवणे, उमरफारूख ककमरी, हिरामण भगत, युवराज कांबळे, बंदेनवाज राजरतन, संदिप कांबळे, नितीन बळखंडे,विजय आवटे, चंद्रकांत खरात, सतिश शिकलगार, आनंदसागर पुजारी, उत्तर काटे, विनायक हेडगे, नितीन माने,राजु कांबळे, प्रकाश कांबळे, अमित चव्हाण,दादासो सदाकळे, राहुल हिरोडगी, विनोद वाघमारे यांच्या सहित बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या व इतर विविध मागणीसाठी आमरण उपोषणासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे हे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उपोषणासाठी बसले असून आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…