विठ्ठल ठोंबरे, शिर्डी / राहता तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन श्रीरामपूर:- श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत म्हणजेच श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर येथे मोठ्या प्रमाणात पत्याचे क्लब चालू आहे. तसेच वार्ड नं.१ ते वार्ड नं. ७ या प्रत्येक वार्डामध्ये, बेलापूर गावामध्ये, आजुबाजुतील गावांमध्ये देखील असे अवैधधंदे चालू आहे.
श्रीरामपूर शहरातील प्रत्येक गल्ली-गल्ली मध्ये, टपर्या मध्ये मुंबई कल्याण नावाने व इतर विविध नावाने आकडे लावून मटका राजरोस चालू आहे. या पत्याच्या क्लब मध्ये व मटका (आकडे) खेळायला येणाऱ्या लोकांना जास्त पैसे कमवुन लवकर श्रीमंत व्हाल असे आमीश दाखवुन मटका खेळण्यास भाग पाडले जाते. या खेळामुळे हजारो लोकांना बरबाद करुन त्यांचे घरे उध्वस्त केली जातं आहे. अनेक लोकांना भिकाला लावण्याचे महा पाप पत्याचे क्लब व मटका (आकडे) चालक मालक करत असल्याने त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना त्वरित नगर जिल्हयातुन तडिपार करण्यात यावे.
कारण की, ते जर श्रीरामपूर तालुक्यात किंवा नगर जिल्ह्यात राहिल्यास त्यांचा हा अवैद्य व्यवसाय चालूच राहील म्हणून या लोकांवर लवकरात लवकर कार्यवाही करून या लोकांवर पोलिसांचा वचक तयार करावे कारण की पत्याचा क्लब मालक व मटका मालक हे लोकांना सांगतात की आम्ही दोन पोलीस कर्मचार्यांच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर पोलीस निरिक्षक व त्यांचे वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांना हप्ते देतो. त्या मुळे आमच्यावर कार्यवाही होऊ शकत नाही. व कोणी आमच्या विरोधात आवाज उठवले तर त्यांना संपून टाकू कारण आमच्याकडे विविध गुन्हेतील गुन्हेगार आहेत व या गुन्हेगारांना पण आम्ही पैसे देऊन मदत करत असतो आणि जे गुंडागर्दीला घाबरणार नाही अशा लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकू असे अनेकांना खाजगी मध्ये सांगितले आहे. त्यामुळे आमच्या जिवाचे बरे वाईट झाले तर पत्याचा क्लब मालक मटका (आकडे) मालक व यांना सहकार्य करणारे ते दोन पोलीस कर्मचारी जबाबदार राहतील याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी.
कारण अनेक लोकांनी सांगितले की विविध गुन्ह्यातील आरोपींना सोडवण्यासाठी ते रोजच पोलीस स्टेशनमध्ये असतात अनेक आरोपींना पोलीस स्टेशन मधून हे सोडून घेऊन जातात. त्यामुळे विविध गुन्ह्यातील आरोपीं बरोबर या लोकांचे हितसंबंध आहेत असे अनेकांनी आम्हाला सांगितले आहे. तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमधील ते दोन पोलीस कर्मचारी कोण आहेत जे मटका (आकडे), पत्याचे क्लब व इतर अवैध धंदे चालवणार्या लोकांनकडून पोलीस अधिकारी मॅनेज करुन देतो म्हणून हप्ते घेतात व अवैध धंदे करणार्या लोकांना मदत करतात. अशा हप्तेखोर पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पोलीस अधिकारी बदनाम होत आहे. त्या दोन भ्रष्ट पोलिस कर्मचार्यांचे मोबाईलची तपासणी करण्यात यावी, त्यांचे रेकॉर्ड काढण्यात यावे व यांच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे देखील चेक करावे म्हणजे आपल्या लक्षात येईल की पोलिस कर्मचारी कोण कोणत्या अवैध धंदे करणार्या लोकांच्या संपर्कात आहेत तसेच कोण कोणत्या गुन्हेगाराला चिरीमिरी घेऊन मदत करतात हे सत्य देखील समोर येईल.
आताच काही दिवसापूर्वी कोल्हार बाभळेश्वर रोडवरील अवैध धंदे करून दादागिरी करून दहशत पसरविण्याचे काम करणाऱ्या मटका पत्त्याचे क्लब चालकांचे सगळे धंदे बंद झाले तिकडे बंद होऊ शकते तर श्रीरामपूर शहरांमध्ये का होऊ शकत नाही असा प्रश्न तमाम श्रीरामपूरकरांना पडलेला आहे. श्रीरामपूर शहरात वाढलेली गुन्हेगारी या अवैद्य व्यवसाय करणाऱ्या लोकांमुळेच आहेत.पोलिसांनी अवैद्य रीतीने व्यवसाय करणारे लोकांवर कारवाई करून श्रीरामपूरकरांना विश्वास मिळवून द्यावा की पोलीस गुन्हेगारांच्या बाजूने नाही. पोलीस गुन्हेगारी संपून नागरीकांना सुरक्षा देण्यासाठी असतात परंतु लोकांना श्रीरामपूर शहर सुरक्षित वाटत नसल्याने व या अवैध रीतीने चालणाऱ्या व्यवसायाकडून नागरिकांना त्रास होत असल्याने आम्ही २९ जून रोजी अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस निरिक्षक, यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती केली होती.
परंतु आमच्या निवेदनाची दखल न घेतल्याने आम्ही दिनांक ९ जुलै रोजी सकाळी 11 वाजता श्रीरामपूर येथील गांधी पुतळ्यासमोर उपोषणास बसणार आहे. हे उपोषण तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत गोरगरिब जनतेच्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या पत्याचे क्लब मालक व मटका (आकडे)मालक यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना अ.नगर जिल्ह्यातुन तडिपार करत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपोषण सोडणार नाही आणि दोन ते तीन दिवसात उपोषण न सुटल्यास मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते जगभर आंदोलन करतील असेही शिंदे म्हणाले.
यावेळी उपोषणकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्रीरामपूर तालुका बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष, प्रविण रोकडे जिल्हा संघटक, विलास पाटणी, जिल्हा उपाध्यक्ष, डॉ. संजय नवथर तालुकाध्यक्ष, सतिष कुदळे शहराध्यक्ष, गणेश दिवसे तालुकाध्यक्ष मनसे सहकार सेना, नितीन जाधव तालुकाध्यक्ष मनसे रोजगार सेना, अमोल साबणे तालुकाध्यक्ष मनसे शेतकरी सेना, निलेश सोनवणे तालुकाध्यक्ष मनसे रस्ते आस्थापना तसेच सर्व मनसे पदाधिकारी.
आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा ४६ मतदारसंघाचे महाविकास…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात दारू बंदी असताना बाहेर…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 11 नोव्हेंबर रोज…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळी…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 चंद्रपूर - बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मतदारसंघातील प्रत्येक गावात…