मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समिती (सावित्रीच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्ट)ह्यांनी रविवारी ७ जुलै रोजी ४०० बेड हॉस्पिटल चे कामकाज लवकरात लवकर सुरू करण्यात यावे आणि लवकरच महाविद्यालयासाठी जागा शोधून शिक्कामोर्तब करण्यात यावे ह्यासाठी आंदोलन पुकारले. त्या आंदोलनाचा २१४ वा दिवस असून रविवारला भर पावसात काळे छत्ते हातात घेऊन डॉ.बाबसाहेब आंबेडकर चौक हिंगणघाट येथे सुरूवात केली. वरील दोन्ही उद्देश पूर्ती होतपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे निवेदन त्यांनी अगोदरच जिल्हाधिकारी साहेबांना 5 जुलै ला दिले होते.
सध्या हिंगणघाट शहरात वैद्यकीय महविद्यालय हा मुद्दा ज्वलंत आहे. महाविद्यालय कुठे होणार हे ठरलेल्या विशेष समिती आणि सुसज्ज अधिकारी वर्ग कार्यरत आहे. नॅशनल मेडिकल कमिशन द्वारे मंजूर झालेल्या इतर सर्व ठिकाणच्या शासकीय महाविद्यालयांचे ठिकाणचे स्थळ निश्चित होऊन प्रकल्पाला निधी प्राप्तीही झालेली आहे.
त्यामधे हिंगणघाट शासकीय महविद्यालयाचे नाव नसल्याचे समजते त्याचे मुख्य कारण म्हणजे इथे अगोदरपासून झालेला सरकारी कामात झालेला हस्तक्षेप असू शकतो. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करण्यापेक्षा महत्वाचे मुद्दे आंदोलनद्वारे मांडण्याचे महिला कृती समितीने ठरवले आहे. सवित्रीच्या लेकी ह्यांनी महाविद्यालय बाबत स्थळ निश्चिती मध्ये सहा महिने लोटून गेल्यावर आजही अस्थिरतेचे वातावरण दिसते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याची कारणे विचारत महाविद्यालयासाठी अत्याधिक महत्वाचे ४०० बेडचे बांधकम त्वरित सुरू करण्यासाठी आता आंदोलनातून आग्रह धरला. त्यांनी आंदोलन जिथे बंद केले होते तिथूनच सुरवात केली. येत्या रविवार पासून पुन्हा आंदोलन पूर्ववत २०७ दिवस पासून पुढे म्हणजे रविवारला आंदोलनाच्या २१४ व्या दिवशी हातात काळे छाते घेऊन निदर्शन केले.
त्यांनी हे आंदोलन पूर्ववत सुरू करण्याचे आणखी एक कारण म्हणजे जनतेत जे शासकिय महाविद्यालयबद्दल संभ्रमाचे वातावरण पसरले आहे ते दूर करणे हेही आहे. त्यासाठी जर ४०० बेड चे कामकाज लगेच सुरू केल्यास हिंगणघाट येथील वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी आहे आणि ते आता आपल्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही असा संदेश जनतेत पसरवणे आहे. या आंदोलनाच्या स्वरुपातून 400 बेड च्या बांधकामाला सूरवात करणे हेच आत्यंतिक महत्वाचे पाऊल सध्या ठरते आणि त्यासाठीच आंदोलन महत्वाचे आहे असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात सीमा मेश्राम, सिंधू दाखणे, निर्मला भोंगाडे, लता साखरकर , इ. उपस्थित होत्या.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…