आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील संत चोखोबा वॉर्डातील टाका मैदानाजवळ मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत आहे अशी गुप्त माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी छापा टाकून गांजा जप्त केला. यादरम्यान एका आरोपीला अटक करण्यात आली. संत चोखोबा टाका मैदानाजवळ ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शेख युसूफ शेख करीम वय 58 वर्ष रा. चोखोबा वार्ड, हिंगणघाट याच्या घरातून गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर घटनास्थळी छापा टाकण्यात आला. घराची झडती घेतली असता ५३७ ग्रॅम गांजा सापडला. 15,960 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत दुर्गे, गुन्हे शाखेचे प्रवीण देशमुख, सुनील मालणकर, नितीन तारचंडी, नरेंद्र आरेकर, रूपेश रघटाटे, विजय हरनर यांनी केले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…