अनिल अडकिंने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सत्र 2023- 24 मध्ये सावनेर तालुक्यातून तृतीय क्रमांक जवाहर विद्यालय वाकोडी ला सन्मानपत्र ,स्मृती चिन्ह व एक लक्ष रुपयाचा धनादेश प्राप्त झालेला आहे.
प्रस्तुत पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा, युवक कल्याण व पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय कॅबिनेट मंत्री सुनील केदार, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषद नागपूरच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे, पंचायत समिती सावनेरचे सभापती गोविंदा ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन गटशिक्षणाधिकारी कश्यप सावरकर, शिक्षण विभाग पंचायत समिती सावनेर व मनोज कुमार हिरुडकर गटविकास अधिकारी पंचायत समिती सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. या पुरस्काराचे सर्व श्रेय जवाहर विद्यालय वाकोडी येथील विद्यार्थी, त्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय पदाधिकारी, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी श्री. व्हि.डी.डाहाके अध्यक्ष, श्री. एन. डी.डाहाके सचिव, वाकोडी गावातील नागरिक, अजनी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.राजूजी भराडे त्याचप्रमाणे मूल्यांकन प्रक्रियेत भाग घेणारे पदाधिकारी, शिक्षण विभाग पंचायत समिती सावनेर यांना जाते. सर्वांचे मनस्वी अभिनंदन.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…