श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होऊन गेले आहेत. ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गानं प्रवास करत असतात, याच पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारनं ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30 हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम सुरू केलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी देशभरातील 73 आणि महाराष्ट्रात 66 धार्मिक स्थळांची यादी केली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ यात्रेची सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं देशभरातील 73 आणि राज्यातील 66 अशा 139 धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच राज्य मंत्रिमंडळानं मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला मंजुरी दिली. या योजनेची माहिती देणारा जीआर रविवारी प्रसिद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या योजनेची घोषणा केली होती.
सिद्धीविनायक, चैत्यभूमी, माउंट मेरी चर्च; मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांचाही समावेश तीर्थक्षेत्रांमध्ये वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ यात्रा, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, चार धाम यात्रा, अयोध्येतील राम मंदिर, द्वारकामधील सोमनाथ मंदिर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश होतो. याशिवाय तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील धार्मिक स्थळं तसेच महत्त्वाच्या बौद्ध आणि जैन स्थळांचाही समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतील 15 धार्मिक स्थळंही या यादीत आहेत. यामध्ये सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी , विपश्यना शिवालय, एक आराधनालय, वांद्रे येथील माउंट मेरी चर्च आणि सेंट अँड्र्यूज चर्च, याशिवाय नाशिकमधील जैन मंदिर आणि नागपुरातील दीक्षाभूमी, जिथे आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. दरम्यान, 2.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्याच्या पात्र व्यक्तींना प्रवास, निवास आणि भोजन खर्च कव्हर करण्यासाठी 30 हजार रुपये 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांना जोडीदार किंवा परिजनांसोबत येण्याची परवानगी आहे.
राज्यस्तरावर योजनेचं परीक्षण आणि आढावा घेण्यासाठी 17 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सदस्य सचिव म्हणून सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…