ना. आत्राम व इस्पात कंपनी बेरोजगारांची दिशाभूल करीत असल्याचे अजय कंकडालवार यांचे गंभीर आरोप.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील वडलापेठा येथील आपल्या मालकीची जागा सुरजागड इस्पात प्रा.लि.करिता २५० एकर दान केल्याचा दावा राज्याचे कॅबिनेट मंत्री, विद्यमान आमदार धर्मरावबाब आत्राम यांनी केला आहे. मात्र सदरहू जागा ही केवळ त्यांची एकट्याची नसून यात इतर नागरिकांची सुध्दा जमीन आहे. तसेच ही जागा वनविभाग व महसूल विभागाची सुध्दा आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी एका कंपनीची भूमिपूजन करून बेरोजगारांना रोजगाराचे लॉलीपॉप देत अख्य जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राज्याचे कॅबिनेट मंत्री आमदार धर्मराव आत्राम करीत असल्याचे गंभीर आरोप काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.
वडलापेठा येथे बुधवार १७ जुलै रोजी सुरजागड इस्पात प्रा.लि.च भूमिपूजन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री तसेच इतर मंत्र्यांच्या उपस्थिती पार पडणार आहे. मात्र यात २५० एकर जागा आपण इस्पात कंपनी उभारण्यासाठी दान देत असल्याची बातमी ना.अत्राम यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. मात्र ही जागा केवळ त्यांचीच नसून यात इतर नागरिकांसह महसूल विभाग व वनविभागाची सुध्दा जागा अतिक्रमण करून हस्तगत केली आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पर्यावरण विषयक जनसुनावणी न घेताच नियमबाहयरित्या कामे सुरू केली आहे. या 250 एकर जमीनी मध्ये काही अतिक्रमण,वनविभागाची त्या नंतर महसूल विभागाची सुद्धा जागा असून या जागेवरील मोठमोठ्या झाडांची वृक्षतोड करून जागा बेकायदेशररित्या आपल्या ताब्यात घेतल्याचे आरोप सुध्दा त्यांनी केली आहे.
सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून ना.आत्राम यांनी सत्तेचा दुरुपयोग करून सरकारी जमीन आपल्या ताब्यात घेतल्याबद्दल या जमिनीबाबत निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच यापूर्वी या क्षेत्रात अनेक वेळा रोजगार मेळावे घेण्यात आले होते. मात्र या मेळाव्या मधून सुशिक्षित तरुण – तरुणींना कोणत्याही प्रकारची कायमस्वरुपी रोजगार मिळालेली नाही. आल्लापल्ली येथे ना.आत्राम यांनी आयोजित केलेली रोजगार मेळावा ही निव्वळ धूळफेक असून फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांसाठीच रोजगार मेळावा आयोजित केल्याचे आरोप सुध्दा कंकडलवार यांनी केली आहे.
वडलापेठा येथे कंपनीला दान केलेली ही जागा नियमानुसार नसून या जागेवर असलेल्या झाडांना अवैद्यपणे तोडन्यात आले असून अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर प्रशासन व सरकार यांची दाखल घेऊन व चौकशी करून फौजदार गुन्हा दाखल करण्यात यावी अन्यथा प्रशासन व सरकारच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याची इशारा देखील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी प्रसिद्धीपत्रकातुन दिलेली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…