रवींद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका काळी पिवळी जीप थेट विहिरीत जाऊन कोसळल्याने मोठा अपघातात घडला आहे. या अपघातात 7 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जालना जिल्यात खळबळ माजली असून या अपघातात तिघांना वाचवण्यात यश आले आहे. या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. राजूर येथील तुपेवाडी जवळ ही घटना घडली आहे.
जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून 7 प्रवास्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा भीषण अपघात दुचाकी मोटर सायकलला वाचविण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट विहिरीत कोसळली आणि त्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांचे जीव वाचवण्यात यश आले आहे.
पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन 12 भाविकांनी भरलेली एक टॅक्सी जालन्याहून राजूर गावाकडे निघाली होती. या दरम्यान जालन्यातील राजूर येथील तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडला. ज्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हर दुचाकी चालकाला वाचवायला गेला आणि टॅक्सी घेऊन थेट विहिरीत कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने कुणालाच स्वत:ला वाचवता आले नाही. त्यामुळे या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला.
यात प्रल्हाद महाजन, रा.चनेगाव, ताराबाई मालुसरे, रा.तपोवन, नंदा तायडे, रा.चनेगाव, प्रल्हाद बिटले, रा. चनेगाव, नारायण किसन निहाळ, रा. चनेगाव, चंद्रभागा घुगे, रा.चनेगाव अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहे. तर तर मयत मधील एकाची ओळख अद्याप पटलेली नाही आहे. या घटनेने अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. सुदैवाने या अपघातात 3 जणांचा जीव वाचला आहे. त्या तीन जणांवर जालन्यात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोध कार्य सुरु करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली आहे. तसेच या घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा घडला? हे कळेल अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
दरम्यान या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फोजफाट्यासह घटनास्थळावर दाखल झाले आहेत. या घटनेचा तपास सुरु आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…