राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मालाड येथील घनश्यामदास सराफ महाविद्यालय येथे आषाढी एकादशी निमित्त मराठी वाङ्मय मंडळातर्फे दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. परंपरेनुसार विठ्ठल रखुमाईची मूर्ती शिरावर धारण करून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात पंढरपूरच्या वारीचा सोहळा उभारला. विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना करून आरती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठलावर अभंग, कविता आणि निबंध सादर केले. शिक्षकांनी देखील विठ्ठलावर भक्ती गीते सादर केली.
किर्तनकार ह. भ.प. सौ. मधुरा प्रभु अनारेडी यांनी प्रमुख अतिथीपद भूषविले आणि आपल्या सुमधुर स्वरात देवशयनी आषाढी एकादशी विषयावर आधारित किर्तन सादर केले. त्यांनी संत एकनाथ यांचा अभंग ‘देवा माझे मन लागो तुझे चरणी…” पूर्व रंगात प्रस्तुत केला आणि गोमाई आजीच्या वारीचे आख्यान उत्तर रंगात सादर केले. शिक्षक आणि विद्यार्थी श्रोतेगण दिंडी व किर्तन सोहळ्यात मंत्रमुग्ध झाले. मराठी वाङ्गय मंडळाचे संचालक डॉ. अनिल धीमधीमे, सदस्य प्रा. रामकृष्ण शिखरे आणि सदस्य प्रा. प्रसाद अनारेडी यांनी महाविद्यालयाचे शिक्षण संचालक सीए डॉ. जयंत आपटे, प्राचार्य डॉ. अश्वत देसाई, उपप्राचार्य सीए गुरुनाथन पिल्ल, उप-प्राचार्या डॉ. सीमा अगरवाल, उप-प्राचार्या डॉ. लिपी मुखर्जी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…