डीपीच्या विद्युत् प्रवाहाच्या झटक्यात एक बालक गंभीर तर दुसरा बचवला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी काजळसरा गावात जाऊन प्रत्यक्ष केली पाहणी. महावितरणाच्या कार्यकारी अभियंता यांना फोन करून यातील दोषी कर्मचाऱ्याची निलंबन करत जखमी बालकांना आर्थिक सहाय्य देण्याची देखिल केली मागणी.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यांतील काजळसरा येथील दहा वर्षाच्या चिमुकल्याला डीपीच्या उघड्या ताराच्या करंट लागून जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांनी गावात जाऊन प्रत्यक्ष गावकऱ्यांशी संवाद साधत डीपीची पाहणी केली.
काल सायंकाळी 5 वाजल्या दरम्यान आखाडी असल्याने पत्राळ बनवण्यासाठी म्हणून अभय उईके वय 10 वर्ष हा बालक पळसाचे पाने तोडण्यासाठी गेला होता. गावालगत रस्त्या शेजारी असलेल्या पळसाच्या पाने तोडत असताना त्याच्या स्पर्श डीपीच्या उघड्या तारांना झाला व त्याला करंट लागुन तो गंभीर जखमी झाला. तर त्याच्यासोबत असलेल्या नवनाथ उईके वय 8 वर्ष हा त्याला वाचवायला गेला असता त्याला देखील सौम्य स्वरूपाच्या विद्युत प्रवाहाच्या झटका लागला. गावकऱ्यांच्या मदतीने ताबडतोब टॉवेल टाकून अभयला ओढून वाचवण्यात आले. यांनतर लगेच जख्मी अभयला उपचारासाठी म्हणून सेवाग्राम येथे हलवण्यात आले.
आज अतुल वांदिले यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन डीपी ची पाहणी केली. गावकऱ्यांनी डीपीच्या प्रश्नाबाबत मागील तीन महिन्यापासून आमदार समीर कुणावर यांना तसेच विद्युत विभागाला डीपीच्या खुल्या ताराबाबत माहिती दिली असल्याचे सांगितले. मात्र या डीपी संदर्भात कुठल्याही उपाययोजना न करण्यात आल्याने ही घटना घडली असल्याचा गावकऱ्यांचा आरोप होता.
तत्पूर्वी याच डीपीला लागून एक बकरी व आज एक साप मृत्युमुखी पडला होता. यामुळे आता या घटनेची दखल घेत अतुल वांदिले यांनी यातील दोषी कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच डीपीची समस्या तात्काळ सोडवुन गावात उपायोजना करण्याची मागणी देखील अतुल वांदिले यांनी केली केली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…