युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी येथे आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ५०० वृक्षाची रोपे लाऊन वृक्ष होई पर्यंत त्याची निगा राखण्याचा संकल्प या वृक्षारोपणाच्या वेळी घेण्यात आला.
या कार्यक्रमांची सुरुवात संत महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण करून त्रिशरण बुद्ध विहार, भीम सैनिक अशोकराव कुंभारे परिसर, शीतला माता मंदिर, स्टेशन वार्ड, आर्वी येथून सुरुवात करण्यात आली. या वेळी प्रमुख अतिथी विश्वास शिरसाट उपविभागीय अधिकारी आर्वी, देवराव खंडेराव पोलीस उपअधीक्षक आर्वी, हरीश काळे तहसीलदार आर्वी, यशवंत सोलसे ठाणेदार पोलिस स्टेशन आर्वी, नितीन जाधव वन परिक्षेत्र अधिकारी आर्वी या प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी दशरथजी जाधव यांनी मनोगत व्यक्त करत असतांना वृक्षारोपनाची गरज व महत्व विशद करून या वृक्षारोपांच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला प्रा. रवींद्र दारुंडे, डॉ. राजपाल भगत, प्रा. पंकज वाघमारे, मार्गदर्शक मधुकर सवाळे, ओमप्रकाश मनवर पाटील, राजेश सोळंकी, राहुपाल नाखले वर्धा सपादक, अर्पित वाहाने सुखदेव नंदागवळी, विनोद कांबळे, सुजित भिवगडे, दुर्योधन गोंडणे, दर्पण टोकसे, प्रवीण काळे, दीपक भगत, आर. आर पवार, राजूभाऊ नेवारे, विनोद सरोदे, भगवान सरोदे,आकाश मुन, प्रमोद घोडीले, विजय कुंभारे, राकेश वरठी , श्याम गोंडेलवार, अमोल गोंडाणे, शुभम वानखडे, सतीश मुन, पंकज नागले, अजय ठाकूर, दिलीप पवार, निर्मला कुंभारे, चंदा डोंगरे, चंदा सरोदे, दुर्गा कांबळे, जया सरोदे, सुलोचना कुंभारे, सीमा गोंडाने, शुभांगी कुंभारे, मेघा सरोदे, लता थुल, सुमन मसराम, अनिता घोडीले यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजल डोंगरे, क्रिष्णा कर्नाके, मनोज गोंडणे, शोभीत कुंभारे, प्रतीक कांबळे, सम्यक माहुरे, आदर्श कुंभारे, तनु सरोदे, लक्की गोंडाणे व आदर्श एकता सामाजिक संघटना कार्यकारणी यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे आयोजन गौतम अशोक कुंभारे अध्यक्ष आदर्श सामाजिक संघटना महा. राज्य यांच्या अथक प्रयत्नातून व सर्वांच्या सहकार्याने करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमर काशीनाथजी भोगे यांनी केले.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…